प्रदूषण आणि डायबेटीस (भाग २) 

डॉ. गौरी दामले 
आज डायबेटीस हा साथीच्या रोगाप्रमाणे सर्वदूर प्रसार झालेला प्रमुख विकार म्हणून परिचित आहे. आपल्या आधीच्या पिढीत हा आजार इतक्‍या मोठ्या प्रमाणात दिसत नव्हता. चुकीची जीवनशैली, वाढते शहरीकरण अशा अनेक कारणांप्रमाणे झपाट्याने वाढलेले प्रदूषण हा मधुमेह वाढीसाठी महत्त्वाचा घटक ठरत असल्याचे आढळून आले आहे. म्हणूनच आज हा विषय पाहू या. 
प्रदूषणाचे कण- 
धूळ, काजळी, राख, परागकण, धूर, जाळ, धुकं स्प्रे, किटकनाशकांची फवारणी, धातूंचे कण या सर्वांमुळे प्रदूषणाचे कण पसरत असतात. तसेच ओझोन, धुरळा सल्फेट, अल्डिहाईटस्‌, क्‍लोरोफ्लयुरोकार्बन्स CFS, डायऑक्‍साईड NO2,  पेरॉक्‍झिऍसिटिल नायट्रेट PAN पेस्टिसाईडस्‌, फायटेटस्‌, टाल्कम पावडर, फॉर्माल्डिहाईड, ऍसबेसटॉस, जस्त, आर्सेनिक, रबर, जिप्सम, प्लॉस्टिक, बिसफेनॉल E, PCBS, डायऑक्‍सिन्स, पाळीव प्राण्यांचे केस व इतर घटक, मृत प्राणी, फर, धुळीतले सूक्ष्मजीव, तंबाखूचा धूर, कीटकनाशके, पॉलिक्‍लोरीनेटेड बायकेमिन्स असे असंख्य प्रदूषण निर्माण करणारे घटक आपल्या आसपास असतात. प्रत्येक 7.9mg/m3 प्रदूषणाने साखरेचा चयापचय ग्लुकोज इनटॉलरन्स होण्याचे प्रमाण नॉर्मल माणसात 15% ने वाढते. तसेच प्रिडायबेटीस 46% लोकांत दिसून येतो.
प्रदूषण कसे टाळावे? 
प्रदूषण होऊ देऊ नये. 
प्रदूषणात बाहेर जाऊ नये. 
3च हेवीड्युटी इंडस्ट्रीयल मास्क वापरावे अटख-एअर क्‍वालिटी इंडेक्‍स तपासत राहावे. दिवसाच्या सर्वात उष्ण वेळात हवेत परागकणांचे प्रमाण खूप असते. तेव्हा बाहेर जाऊ नये. फुटपाथवरून चालताना बिल्डिंगच्या बाजूने चालावे रोडच्या बाजूने चालल्यास 1/10 प्रदूषण जास्त असते. कारचे एक्‍सॉस्ट पाईप लहान मुलांच्या बरोबर नाकाच्या म्हणजेच श्‍वासाच्या उंचीवर येतात त्यामुळे वाहनांमध्ये मुलांना कडेवर उचलून घ्यावे. नाकाचा दाह जाणवल्यास तेथून दूर जावे. झेरॉक्‍स मशिन्स, लेजर प्रिंटर्स यातून सतत ओझोन गॅस उत्सर्जित होत असतो त्यापासून लांब राहावे. ब्यूबेरी, व्हिटॅमीन सी, मोडाची कडधान्ये, हिरव्या भाज्या, पपई, ग्रीन टी, फळं, जांभळ्या भाज्या यामुळे प्रदूषणाचे अपाय कमी होतात.
घरगुती प्रदूषण कसे टाळावे?
पाणी भरपूर प्यावे व आहारात मेदघटक कमी असावे. आसपास बांधकाम चालू असेल तर ती धूळ घरात येऊ देऊ नये. रॅडॉन हा विषारी वायू त्यात असतो. घरात खेळती हवा असावी. सिगारेट, तंबाखूचे व्यसन थांबवा. ऍश ट्रे सतत स्वच्छ ठेवा. डिंक, रंग, डिटर्जंट, क्‍लिनर्स, वॉरनिश, ब्लीच हे लांब अंतरावर ठेवा. कार्बन मोनॉक्‍साईड व स्मोक अलार्म लावा. बेडरूममध्ये प्रिंटर ठेवू नका. खायचा सोडा, लिंबू, व्हिनेगर, सायट्रीक ऍसिड, स्वच्छतेसाठी वापरा, नैसर्गिक साहित्य वापरा. लिड पेंट, ऍसबेस्टॉसपासून दूर राहा. हेपा फिल्टरवाले व्हॅक्‍यूम क्‍लिनर वापरण्याची सवय लावून घ्या. त्याने धूळ, कचरा न उडता शोषला जातो. खोलीत चहाची ओली पाने, कोळसा बाबूंची झाडे ठेवा. स्प्रे, डिओडरंट फ्रेशनर वापरू नका. खोलीत हेपा एअर फिल्टर लावा. ए.सी. स्वच्छ ठेवा. नैसर्गिक कीटकनाशकेच वापरा. हे सगळे सहजतेने करता येण्याजोगे बदल स्वीकारा व पुढच्या पिढीला गंभीर प्रदूषणापासून वाचवा. मधुमेहाच्या विळख्याला आवरा.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)