मतांसाठी पुलवामा दहशतवादी हल्ला घडवला – सपा नेते 

नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरस्थित पुलवामामध्ये सीआरपीएफच्या जवानांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यावर समाजवादी पक्षाचे नेते राम गोपाळ यादवने वादग्रस्त वक्तव्य केले आहे. मतांसाठी पुलवामा दहशतवादी हल्ला घडवून आणण्यात आला होता. हे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पाकिस्तान पंतप्रधान इम्रान खान यांचे षडयंत्र आहे, असा खळबळजनक आरोप आर. जी. यादव यांनी केला आहे.

आर.जी. वर्मा म्हणाले कि, मतांसाठी पुलवामा दहशतवादी हल्ला घडवून आणण्यात आला होता. त्यामुळे अर्धसैनिक दले सरकारवर नाराज आहेत. जम्मू-काश्मीर महामार्गावरून जवानांचा एवढा मोठा ताफा जात असताना चेकिंग करण्यात आली नाही. तसेच साध्या बसमधून जवानांना रवाना करण्यात येत होते. हे एक षडयंत्र आहे. या कटात कोण सामिल होत हे मी आत्ता सांगू इच्छित नाही. मात्र, सरकार बदलल्यानंतर याची जेव्हा चौकशी होईल तेव्हा बड्या नेत्यांची पोलखोल होईल, असेही त्यांनी म्हंटले.

दरम्यान, आर. जी. वर्माच्या वक्तव्यावरून नवा राजकीय वाद उफाळण्याची शक्यता आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)