अहमदाबाद – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 95 वर्षांच्या मातोश्री हिराबा यांनी आज आपले धाकटे चिरंजीव पंकज मोदी यांच्या समवेत रैसान गावातील मतदान केंद्रावर जाऊन मतदानाचा हक्क बजावला. हे मतदान केंद्र गांधीनगर पासून दहा किमी अंतरावर आहे. त्यांच्या समवेत पंतप्रधान मोदींचे धाकटे बंधु पंकज मोदी आणि अन्य कुटुंबिय उपस्थित होते. मतदान करण्यापुर्वी पंतप्रधानांनी आपल्या मातोश्रींची भेट घेतली. त्यावेळी मातोश्रींनी आपल्या पंतप्रधानपुत्राला शाल, श्रीफळ आणि मिठाई देत आशिर्वाद दिले.
लोकसभा निवडणुकीत यश मिळो असा आर्शिवादही त्यांनी त्यांना दिला.त्या मतदान केंद्रावर आल्या असताना माध्यमांच्या प्रतिनिधींनी त्यांना गराडा घातला. पण त्यांच्याशी त्यांनी काही बोलणे टाळले. 95 व्या वर्षीही त्यांची प्रकृती एकदम धडधाकट असून त्यांनी कोणाच्या मदतीशिवाय आपला मतदानाचा हक्क बजावला.