रमझान सणाच्या दिवशी मतदान ठेवलेले नाही – निवडणूक आयोग. 

नवी दिल्ली – रमझान सणाच्या दिवशी मतदान ठेवलेले नाही, असे स्पष्टीकरण निवडणूक आयोगाने केले आहे. रमझानमध्ये निवड्‌णुका घेण्याबाबत काही राजकीय पक्ष आणि मुस्लिम धर्मगुरू यांनी हरकत घेतली आहे. रमझानच्या महिन्यात लोकसभा निवडणुका घेण्याच्या निवडणूक आयोगाच्या हेतूबाबतच त्यांनी शंका व्यक्त केली आहे. रमझानच्या महिन्यात निवडणुका ठेवल्याने मुस्लिम मतदानाचे प्रमाण कमी होईल आणि त्याचा फायदा भाजपाला होईल असे आप चे नेते संजय सिंह आणि आमदार अमानतुल्लह खान यांनी म्हटले होते.

एकीकडे निवडणूक आयोग निवडणुकीत जनतेने भाग घ्याव्या असे आवाहन करत जाहिरातींवर कोट्यवधी रुपये खर्च करत आहे, आणि दुसरीकडे तिसऱ्या टप्प्यातील मतदान रमझानच्या पवित्र महिन्यात ठेवून मुस्लिम मतदान कमी होण्याची योजना करत आहे, असे ट्‌विट आप चे नेते संजय सिंह यांनी केले आहे. तर, 12 मेचा दिवस, दिल्लीत रमझान असेल आणि मुसलमानांचे मतदान कमी होईल. याचा सरळ फायदा भाजपाला होईल, असे ट्‌विट अमानतुल्लाह यांनी केले आहे.
लखनौ इदगाहचे इमाम आणि शहर काझी मौलाना रशीद महली यांनीही मतदानाच्या तारखांबाबत प्रश्‍नचिन्ह उभे केले आहे.

निवडणूक आयोगाने मतदानासाठी आठ तासांचा अवधी दिलेला आहे. या काळात कधीही जाऊन मतदान करता येईल, विरोधी पक्ष पराभवाची कारणे आतापासूनच शोधू लागले आहेत, असे भाजपा नेते आणि उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांनी म्हटले आहे. तर रोजा पाळणारे ऑफिसात जातात, इतर कामेही करतात. रमझानमध्ये मतदानाची ही पहिलीच वेळ नाही, तेव्हा त्याबाबत शंका घेऊ नयेत असे भाजपा नेते शहनवाज हुसेन यांनी म्ह्टले आहे. उत्तर प्रदेश, बिहार आणि बंगालमध्ये 7 टप्प्यातील मतदान करणे रोजा पाळणारांसाठी कठीण होणार असल्याचे आणि या तीनही राज्यांमध्ये अल्पसंख्याकांचे प्रमाण आहे आणि मुस्लिमांनी मतदान करावे अशी भाजपाची इच्छा नाही, असे तृणमूल नेते आणि कोलकात्याचे महापौर फिरहाद हाकिम यांनी म्हटले आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)