नगरपरिषदा, नगरपंचायतींसाठी 27 जानेवारीला होणार मतदान

11 जागांसाठीही होणार पोटनिवडणूक

मुंबई: राजगड जिल्ह्यात कर्जत, मलकापूर (जि. सातारा), श्रीगोंदा (जि. अहमदनगर), आरमोरी (जि. गडचिरोली) या नगरपरिषदा व महादुला (जि. नागपूर) नगरपंचायतीच्या सार्वत्रिक; तसेच विविध नगरपरिषदा व नगरपंचायतींमधील 11 रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांसाठी 27 जानेवारी 2019 रोजी मतदान होणार असल्याची माहिती राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी आज येथे दिली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

2 ते 9 जानेवारी 2019 या कालावधीत नामनिर्देनपत्र स्वीकारली जातील. नामनिर्देनपत्रांची 10 जानेवारी रोजी छाननी होईल. मतदान 27 जानेवारी रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 यावेळेत होईल. मतमोजणी 28 जानेवारी 2019 रोजी सकाळी 10 वाजता सुरू होइल, असे सहारिया यांनी सांगितले.

पोटनिवडणूक होत असलेली नगरपरिषद/ नगरपंचायतनिहाय जागा अशी: राजापूर (जि.रत्नागिरी)- 6अ, आळंदी (पुणे)- 9अ, फलटण (सातारा)- 12अ, दुधनी (सोलापूर)- 2ब, पन्हाळा (कोल्हापूर)- 8क, दिंडोरी (नाशिक)- 15, यावल (जळगाव)- 1अ, बीड- 11अ, बुलढाणा- 12ब, अर्जुनी (गोंदिया)- 14, गोरेगाव (गोंदिया)- 14.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)