नागपूर: जगातील उंचीने सर्वात छोटी महिला ज्योती आमगे यांनी आज नागपूर मतदारसंघातील एका मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला. ज्योती आगामे यांची उंची अवघी दोन फूट (६३ सेंटीमीटर) एवढी आहे. इतक्या कमी उंचीच्या ज्योती आपल्या मतदानाचा हक्क बजावण्यासाठी निडरपणे रांगेत उभ्या राहिल्या. ज्योती यांचे वय २५ वर्ष असून, त्यांनी आपले नाव ‘गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड’ मध्ये नोंदवले आहे.