केवळ एका मतदारासाठी उभारले मतदान केंद्र

जुनागड (गुजरात) – देशासह राज्यात गेल्या काही दिवसांपासून निवडणूकी लोकसभा निवडणुकीसाठी मतदानाला सुरुवात झाली असून आज तिसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडत आहे. देशात मतदानाची टक्केवारी वाढण्यासाठी प्रशासनाकडून जागृती करण्यात येत आहे. अशातच गुजरात राज्यातील जुनागड येथे असलेल्या गिरवनात एक मतदान केंद्र उभारण्यात आले आहे. जुनागडमधील हे मतदान केंद्र केवळ एका मतदारासाठी उभारण्यात आले आहे. भरतदास बापू असे या मतदाराचे नाव आहे. भरतदास बापू यांनी आज आपल्या मतदानाचा हक्क बजावला आहे.

भरतदास बापू यांनी त्यानंतर संवाद साधताना प्रशासन केवळ एका मतदारासाठी, संपूर्ण मतदान केंद्राचा खर्च करते. त्यामुळे मी मतदान केले आहे आणि या मतदान केंद्रात १०० टक्के मतदान झाल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. तसेच मतदानाची जागृती करत, सर्वत्र १०० टक्के मतदान होण्यासाठी भरतदास बापू यांनी सर्वांना मतदान करण्यास विनंती केली आहे.

https://twitter.com/ANI/status/1120655641058500608

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)