राजस्थान, मध्यप्रदेश व छत्तीसगड मध्ये कॉंग्रेसची सत्ता : निवडणूक सर्वेक्षण

File photo
एबीपी न्युज, सीवोटरचे निवडणूक सर्वेक्षण 
नवी दिल्ली: पाच राज्यांच्या आगामी विधानसभा निवडणुकीत राजस्थान, मध्यप्रदेश आणि छत्तीसगड मध्ये कॉंग्रेसला बहुमत मिळेल असे संकेत एबीपी न्युज आणि सी वोटर संस्थेच्या जनमत चाचणीतून मिळाले आहेत. या चाचण्यांनुसार राजस्थानात कॉंग्रेसला दणदणीत यश मिळण्याची शक्‍यता आहे. त्यांना मिळणाऱ्या मतांचे प्रमाण जवळपास 50 टक्के इतके असून मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांच्या पेक्षा मुख्यमंत्रीपदासाठी कॉंग्रेसचे सचिन पायलट यांना लोकांनी अधिक पसंती दर्शवली आहे.
या सर्वेक्षणानुसार कॉंग्रेसला राजस्थान विधानसभेच्या दोनशे जागांपैकी कमाल सुमारे 142 जागा मिळण्याचा अंदाज या चाचणीत वर्तवण्यात आला आहे. दुसऱ्या चाचणीत तेथे कॉंग्रेसला दोनशेपैकी 124 ते 138 जागा मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
तथापी एबीपी न्युज आणि सीवोटरच्या मध्यप्रदेश आणि छत्तीसगड मधील चाचणीत सध्या कॉंग्रेसला बहुमत मिळणार असल्याचे दर्शवण्यात आले असले तरी भाजप आणि कॉंग्रेस यांच्या मतांमध्ये फार मोठा फरक नाही त्यामुळे तेथे अजून चुरशीला वाव आहे असे नमूद करण्यात आले आहे. या चाचणीत 230 जागा असलेल्या मध्यप्रदेश विधानसभेच्या निवडणुकीत कॉंग्रेसला 122 जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तेथे साधे बहुमत मिळवण्यासाठी 116 जागांची गरज आहे. तर छत्तीसगड विधानसभेतील 90 जागांपैकी कॉंग्रेसला 47 जागा मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
या चाचणीनुसार भाजपला मध्यप्रदेशात 108 तर छत्तीगड मध्ये 40 जागा मिळतील आणि त्यांचे बहुमत थोडक्‍यात हुकेल असे नमूद करण्यात आले आहे. राजस्थानात मुख्यमंत्रीपदासाठी सचिन पायलट यांना 36 टक्के जणांनी पाठिंबा दर्शवला आहे तर अशोक गेहलोत यांना 24 टक्के लोकांनी पाठिंबा दर्शवला आहे. विद्यमान मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांना 27 टक्के लोकांनी पसंती दर्शवली आहे.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
3 :thumbsup:
1 :heart:
2 :joy:
2 :heart_eyes:
2 :blush:
1 :cry:
1 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)