लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर पुलवामा हल्ल्याचे राजकारण : ममतांचा आरोप

गुप्तचरांकडून माहिती मिळूनही सरकार गप्प का राहिले?

कोलकाता – आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या सरकारने पुलवामा हल्ल्यावरून राजकारण चालवले आहे असा आरोप तृणमुल कॉंग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनी केला आहे. या हल्ल्याविषयी गुप्तचर सूत्रांकडून माहिती मिळाल्यानंतरही मोदी सरकारने त्या विषयी कोणतीही उपाययोजना केली नाही. हल्ल्यानंतरही या सरकारने काहीही केलेले नाही असे त्यांनी म्हटले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पक्षाच्या कोअर कमिटीच्या बैठकीत बोलताना त्यांनी हा आरोप केला. त्या म्हणाल्या की पुलवामात अशा प्रकारचा हल्ला होऊ शकतो अशी स्पष्ट माहिती गुप्तचर सूत्रांनी दिली होंती. पण मोदी सरकारने त्यावर कोणतीही कृती न करता आपल्या जवानांचे बळी त्यात जाऊ दिले आहेत. त्यांच्या मृतदेहांवर राजकारण करण्यासाठीच त्यांनी हा प्रकार केला असल्याचा आरोपही त्यांनी केला. या घटनेच्या पार्श्‍वभूमीवर त्यांनी देशात युद्धज्वर निर्माण केला आहे. त्यातही राजकारण असून त्यांना केवळ निवडणुका जिंकण्यासाठीच असे वातावरण निर्माण करणे गरजेचे आहे असे त्या म्हणाल्या.

मोदी-शहा या दोन लोकांनीच हे सरकार चालवले असून त्यांचेच हात रक्ताने माखले आहेत असे त्या म्हणाल्या. सत्ता मिळवण्यासाठी हे लोक कोणत्याही थराला जाऊ शकतात. मतदार यंत्रांमध्ये गडबड करण्याचा प्रयत्नही त्यांच्याकडून पुन्हा होऊ शकतो म्हणून कार्यकर्त्यांनी जागरूकपणे त्यांचे हे प्रयत्न हाणून पाडले पाहिजेत असे आवाहन त्यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)