राजकारण वर्ज्य नाही : अँजेलिना जोली

हॉलिवूड ऍक्‍ट्रेस अँजेलिना जोली आता राजकारणात सक्रिय होणार, असे वृत्त काही दिवसांपूर्वी पसरले होते. आपल्याला राजकारणामध्ये येण्यात काहीही अडचण असणार नाही. राजकारण आपल्याला कधीही वर्ज्य असणार नाही, असे अँजेलिनाने एका इंटरव्ह्यूमध्ये म्हटले होते. तेंव्हापासून ही चर्चा वेगाने वाढली आहे. यामध्ये तथ्य आहे का असे विचारले असता अँजेलिनाने स्पष्टिकरण दिले आहे.

जर हा प्रश्‍न 20 वर्षांपूर्वी विचारला असता, तर मी हसले असते. राजकारणात आता तरी जाण्याचा कोणताही पर्याय नाही. मात्र जर तशी संधी मिळाली तर राजकारण आपल्याला वर्ज्य नाही. मी तेथे जाईन जेथे माझी खरोखर आवश्‍यकता आहे, असे अँजेलिनाने म्हटले आहे. आपण नक्की काय करू शकतो, याबाबत आपणच खात्रीशीरपणे सांगू शकत नाही. आपल्यामध्ये जर राजकारणाला योग्य अशी प्रतिभा असेल तर कोणत्याही पर्यायापर्यंत जाण्याची तयारी असल्याचे तिने सांगितले. अँजेलिना संयुक्‍त राष्ट्राच्या कार्यामध्येही सक्रिय असते. गेल्या काही वर्षांपासून अँजेलिना हॉलिवूडमध्ये विशेष सक्रिय नाही. तिने सिनेमे करण्याचे सूतोवाच केले होते. पण अजून ती कोणत्याही सिनेमाच्या प्रोजेक्‍टमध्ये सक्रिय झाल्याचे समजलेले नाही.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)