“अवनी’वरून नाहक राजकारण केले जातेय : नितीन गडकरी 

नागपूर – “अवनी’ वाघिणीला मारण्यावरून जे राजकारण केले जात असून सुधीर मुनगंटीवार यांच्या राजीनाम्याची मागणी करणे अयोग्य आहे, असे स्पष्ट करत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मुनगंटीवार यांना एकप्रकारे क्‍लीनचिट दिली आहे. मुनगंटीवार यांचे काम चांगले आहे, असेही त्यांनी सांगितले.

गडकरी म्हणाले, नागपूर येथे गडकरी यांनी अवनी वाघिणीला मारण्यावरून सर्व आरोप तथ्यहीन असल्याचे म्हटले आहे. कुठल्याही उद्योगपतींसाठी जमीन दिली जात नसल्याचेही ते म्हणाले. या वाघिणीने तब्बल 13 आदिवासींवर हल्ला करत त्यांना ठार मारले आहे. मात्र, याबाबत कुणीही बोलत नाही. राज्यातील राजकारण्यांनी केलेल्या आरोपाबाबत कीव येत आहे. तसेच मुनगंटीवार यांचा राजीनामा मागितला जातोय, तो चुकीचा आहे, असे त्यांनी म्हटले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

दरम्यान, नरभक्षक टी1 वाघिणीला ठार केल्यानंतर मनेका गांधी-सुधीर मुनगंटीवार यांच्यात शाब्दिक वाद सुरू आहे. तसेच वन विभागाने बिर्ला आणि अंबानी यांच्या उद्योगांसाठीच अवनी वाघिणीचा बळी घेतल्याचा आरोप राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)