पुलवामा हल्ल्याचे मोदी सरकारकडून राजकारण : ममतांचा आरोप

गुप्तचरांकडून माहिती मिळूनही सरकार गप्प का राहिले? 

कोलकाता – आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या सरकारने पुलवामा हल्ल्यावरून राजकारण चालवले आहे असा आरोप तृणमुल कॉंग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनी केला आहे. या हल्ल्याविषयी गुप्तचर सूत्रांकडून माहिती मिळाल्यानंतरही मोदी सरकारने त्या विषयी कोणतीही उपाययोजना केली नाही. हल्ल्यानंतरही या सरकारने काहीही केलेले नाही असे त्यांनी म्हटले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

या घटनेच्या पार्श्‍वभूमीवर त्यांनी देशात युद्धज्वर निर्माण केला आहे. त्यातही राजकारण असून त्यांना केवळ निवडणुका जिंकण्यासाठीच असे वातावरण निर्माण करणे गरजेचे आहे मोदी-शहा या दोन लोकांनीच हे सरकार चालवले असून त्यांचेच हात रक्ताने माखले आहेत असे त्या म्हणाल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)