राजकारणात केवळ सत्ताकारणालाच अधिक महत्व : गडकरींची खंत

यवतमाळ: राजकारणात केवळ सत्ताकारणालाच अधिक महत्व आले आहे पण केवळ सत्ताकारण म्हणजे राजकारण नव्हे हे सर्वांनी लक्षात घ्यायला हवे. समाजकारण आणि विकासकारण यालाही राजकारणात महत्व असले पाहिजे. राजकारणात चांगल्या माणसांनीही आले पाहिजे तरच त्यांच्या योगदानाने राजकीय वातावरण बदलणे अशक्‍य नाही असे मत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले आहे.

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलानाच्या समारोप समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. गेले तीन दिवस सुरू असलेल्या साहित्य संमेलनाचा आज समारोप झाला. नयनतार सहगल यांच्या निमंत्रण वापसीच्या वादामुळे गाजलेल्या या संमेलनातील अनेक कार्यक्रमांवर निमंत्रीतांनी बहिष्कार घातला होता पण तरीही हे संमेलन नियोजित कार्यक्रमानुसार पार पाडण्यात संयोजक यशस्वी झाले.

समारोप प्रसंगी बोलताना गडकरी यांनी साहित्याने सामान्य माणसाला प्रगल्भ बनवण्यात मोठे योगदान दिल्याचा उल्लेख केला. ते म्हणाले की साहित्य माणसाला सुस्कृत बनवते. चांगले जगण्यासाठी साहित्याची साथ उपयोगी ठरते असे ते म्हणाले. त्यांनी सहगल प्रकरणावर कोणतेही भाष्य करणे टाळले. तथापि मतभेद असले तरी मनभेद असता कामा नयेत असे सूचक उद्‌गारही त्यांनी यावेळी काढले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)