तुमच्या नावाने राजकारण करणाऱ्यांना.. तुमचा इतिहासाचे महत्व कळलेच नाही !

मुंबई – छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त स्वाभिमान संघटनेचे अध्यक्ष आणि काँग्रेसचे आमदार नितेश राणे यांनी ट्विटर छत्रपती शिवाजी महाराज विनम्र अभिवादन केले आहे. ट्विटरवर छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो पोस्ट करत राणे यांनी लिहिले आहे कि, ”शिवराय श्वास । शिवराय ध्यास । जगण्याची आस । शिवराय हा ।।” विनम्र अभिवादन केले आहे. तसेच  शिवसेना – भाजपा युतीवर टीका केली आहे कि,  ”माफ करा राजे.. तुमच्या नावाने राजकारण करणाऱ्यांना.. तुमचा इतिहास आणि त्या भगव्याचे महत्व कळलेच नाही !! आपल्याच रयतेला फसवून.. स्वराज्य कधीच स्थापन करू शकणार नाही!!” यापूर्वीही नितेश राणेंनी ”सामना” या मूकपत्रातील अग्रलेखाचा दाखल देत उद्धव ठाकरे आणि शिवसेनेला लक्ष्य केलं. बायको असावी तर शिवसेनेसारखीच…. असं ट्विट राणेंनी केले होते.

यातच आगामी लोकसभा निवडणूक जवळ आल्याने आता शिवसेना-भाजप युतीचा प्रश्न सुटला. मात्र या युतीच्या मुद्यावरून गेल्या काही दिवसांपूर्वीपासून राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली होती. राष्ट्रवादी काँग्रेस आणि महाराष्ट्र स्वाभिमानी पक्षांकडून ट्विट करत शिवसेना तसेच भाजपवर टीकास्त्र सोडण्यात आले होते.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)