अफगाणिस्तानात राजकीय तोडगा काढू : ट्रम्प यांचा विश्‍वास

वॉशिंग्टन : तालिबान बरोबरची सध्या सुरू असलेली चर्चा विधायक टप्प्यावर आली असून गेली दोन दशके अफगाणिस्तानात सुरू असलेल्या युद्धजन्य स्थिती वर तेथे निश्‍चीत राजकीय तोडगा काढला जाईल असा विश्‍वास अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्‍त केला आहे. अमेरिकन संसदेच्या संयुक्तसभेला उद्देशून केलेल्या आपल्या वार्षिक भाषणात त्यांनी हा विश्‍वास व्यक्त केला.

ते म्हणाले की आपल्या सैनिकांनी तेथे मोठी वीरता दाखवली आहे. त्यांच्या धाडसाबद्दल आम्ही सारे देशवासिय त्यांचे आभारी आहोत. या रक्तरंजीत संघर्षावर आता तेथे राजकीय तोडगा काढण्याची वेळ आली असून आम्ही हा तोडगा निश्‍चीत काढू असा आम्हाला विश्‍वास वाटतो आहे. या साठी आम्ही तेथे तालिबान सह विविध घटकांशी चर्चा करीत आहोत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

आम्ही या चर्चेत जशी प्रगती करीत जाऊ तसे आम्ही तेथील आमचे सैन्य कपात करीत जाऊ असेही त्यांनी म्हटले आहे. सध्या अमेरिकेचे चौदा हजार लष्करी जवान अफगाणिस्तानात तळ ठोकून आहेत. अफगाण विषयक चर्चेत यश मिळेल की नाही याची आम्हाला कल्पना नाही पण हे दोन दशकांचे युद्ध थांबवून शांततेसाठी प्रयत्न करणे तरी आमच्या हातात आहे ते आम्ही करीत आहोत. याच वेळी आमच्या विरोधात कोणतेही गैरधाडस करू नका असा इशाराही द्यायला ते विसरले नाहींत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)