देशातील राजकीय आरक्षण बंद व्हावे: आनंदराज आंबेडकर 

नांदेड: देशातील राजकीय आरक्षण हे सर्वप्रथम बंद करण्यात यावे. कारण या आरक्षणाचा कोणत्याही समाजाला काहीच लाभ मिळत नाही, असे विधान रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांनी केले आहे. ते नांदेड येथे बोलत होते.
आंबेडकर म्हणाले, देशात एससी, एसटी, ओबीसी आणि अन्य राजकीय आरक्षणे आहेत. ती राजकीय आरक्षणे काढून टाकायला हवी. अशा राजकीय आरक्षणातून विधानसभेत आणि लोकसभेत किंवा अन्य कोणत्याही सभागृहात गेलेले लोकप्रतिनिधी हे सर्व मतदारांचे आणि त्या त्या पक्षाचे असतात. त्यामुळे याचा समाजाचा काहीही फायदा होत नाही. हीच भूमिका डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनीही मांडली होती. आपण या भूमिकेशी पूर्णपणे सहमत आहे, असे ते म्हणाले.
दुसरीकडे आनंदराज आंबेडकर यांनी एमआयएम आणि भारिप युतीला भाजपची बी टीम म्हणणे ही मानसिकता चुकीची असल्याचे म्हटले आहे. भाजपला विरोध करणाऱ्यांनी कॉंग्रेससोबत जावे आणि कॉंगेसला विरोध करणाऱ्यांनी भाजपसोबत जावे, अशी अपेक्षा करणे चुकीची आहे. ज्यांना ज्यांची विचारधारा पटते ते एकमेकांसोबत असतात. आमचा पक्ष हा वंचित आघाडीसोबत जाणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)