सोशल मिडीयावरील राजकिय पक्षांची पोस्ट रोखू शकत नाही : निवडणूक आयोगाचे हायकोर्टात स्पष्टीकरण

मुंबई: निवडणूकीत मतदानापूर्वी 48 तास अगोदर एखाद्या राजकिय पक्षाबाबत युट्युब, फेसबूक, ट्विटर सारख्या सोशलमिडीयाच्या माध्यमातून टाकण्यात आलेली पोस्ट रोखू शकत नाही, असे निवडणूक आयोगाने हायकोर्टात स्पष्ट केले.

निवडणूकीच्या दोन दिवसाअगोदर राजकीय पक्षाबाबत सोशल मिडीयावर जाहिरातबाजी तसेच पक्षाच्या प्रचाराबाबत पोस्ट अपलोड केल्या जातात. त्यावर बंदी घालावी, अशी मागणी करणारी जनहित याचिका ऍड. सागर सुर्यवंशी यांच्या वतीने ऍड. अभिनव चंद्रचुड यांनी हायकोर्टात दाखल केली आहे.

या याचिकेवर मुख्य न्यायमूर्ती नरेश पाटील आणि न्यायमूर्ती एन. एम. जामदार यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. यावेळी निवडणूक आयोगाच्या वतीने ऍड. प्रदीप राजगोपाल यांनी बाजू मांडताना यासंदर्भात नियम तयार करण्यात आले आहेत. तसेच राजकीय पक्षांनी निवडणूकीच्या दोन दिवस अगोदर कोणताही प्रचार अथवा जाहिरात करु नये, अशा सुचनाही देण्यात आल्या आहेत. याशिवाय इलेक्‍ट्रॉनिक मिडीयाच्या माध्यमातून प्रसिद्धी देण्यात येवू नये, अशी तरतूदही करण्यात आली आहे. मात्र तूर्त ही पोस्ट रोखू शकत नाहीत, अशी कबूली दिली.

तर याचिकाकर्त्यांच्या वतीने ऍड. अभिनव चंद्रचुड यांनी अमेरिका आणि इंग्लड येथे निवडणूकी अगोदर या जाहिराती तपासल्या जातात. ही प्रक्रिया भारतात सुरु करावी, अशी मागणी त्यांनी केली. त्यावेळी न्यायालयाने उभयतांना यावर उपाय सुचवण्याचे आदेश देऊन याचिकेची सुनावणी तहकूब ठेवली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)