राजकीय हेतूने प्रेरित खटले मागे घेणार : कमलनाथ

भोपाळ (मध्य प्रदेश): राजकीय हेतून प्रेरित खटले मागे घेणार असल्याचे मध्य प्रदेशाचे मुख्यमंत्री कमलनाथ यांनी जाहीर केले. पूर्वीच्या भाजपा सरकारने दाखल केलेल्या खटल्यांबाबत ते बोलत होते. गेल्या वर्षी 2 एप्रिलच्या भारत बंदच्या काळात दाखल करण्यात आलेले खटले मागे घेतले नाहीत, तर कमलनाथ सरकारला दिलेला पाठिंबा काढून घेण्याचे बसपाप्रमुख मायावती यांनी म्हटले होते, त्या पार्श्‍वभूमीवर कमलनाथ यांची ही घोषणा आली आहे.

गेल्या 15 वर्षातील भाजपा सरकारने राजकीय हेतूने दाखल केलेले कॉंग्रेस, समाजवादी पार्टी, बसपा, डावे पक्ष, नर्मदा बचाव आंदोलनकर्ते, शेतकरी , कर्मचारी आणि पत्रकार या सर्वांवरील खटले मागे घेणार असल्याचे कमलनाथ यांनी स्पष्ट केले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

मायावती यांच्या पाठिंबा काढून घेण्याच्या धमकीने हा निर्णय घेतला का? या प्रश्‍नाला कमलनाथ यांनी नकारार्थी उत्तर दिले. मध्य प्रदेश आणि राजस्थानमधील पूर्ण बहुमत न मिळालेली कॉंग्रेस सरकारे सपा-बसपाच्या पाठिंब्यावर सत्तारूढ झालेली आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)