राजकीय धूलिवंदन : होळीच्या साहित्यातून पक्षाचा प्रचार !

लोकसभा निवडणूका काही दिवसांवर येऊन ठेपल्या असताना राजकीय नेत्यांनी प्रचाराचे रणशिंग फुंकले आहे. वेगवेगळ्या माध्यमातून निवडणुकांचा प्रचार सुरु आहे. होळीचे औचित्य साधून होळीच्या साहित्यांवर राजकीय नेत्यांची जाहिरातबाजी पाहायला मिळत आहे. विविध राजकीय नेत्यांनी कंबर कसली असून राजकीय धूलिवंदन खेळण्यास सज्ज झाले आहेत.

हाय-व्होल्टेज राजकीय लढाईचे स्वरूप आलेल्या लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी सोमवारी निवडणूक आयोगाने अधिसूचना जारी केली आहे. पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रासह 20 राज्यांच्या 91 लोकसभा मतदारसंघांमध्ये 11 एप्रिलला मतदान होणार.

दरम्यान, यावर्षी निवडणुकीच्या प्रचारासाठी सण-उत्सवांचा देखील उपयोग करण्यात आला आहे. राजस्थानमध्ये मोदी सरकारकडून अटल साहित्य केंद्रावर पक्षाचे चित्र आणि पक्षाच्या ध्वज कलरचे रंग विक्री साठी ठेवण्यात आले आहेत. मोदी है ! तो मुमकिन है !, अश्या घोषणा साहित्यांवर लिहल्या आहेत. त्यामुळे सण-उत्सव तरी राजकारणापासून दूर ठेवा असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे.

याला विरोधी पक्षांनी विरोध केला केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने यावर आचार संहितेचा भंग असल्याचा ठपका ठेवला आहे. भाजपाकडून वारंवार आचारसंहितेचे उल्लंघन होत आहे. आचारसंहिता लागू असतानाही भाजपाकडून सोशल मीडियाद्वारे भेटवस्तूंचे आमीष दाखवणे सुरू आहे तर ई-कॉमर्स वेबसाइट्सवर भाजपाचा प्रचार करणाऱ्या वस्तू उपलब्ध आहेत. मतदारांना आकर्षित करण्याचा भाजपाचा हा प्रकार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसने म्हटले आहे.

https://twitter.com/NCPspeaks/status/1107967623990403073

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)