अन्‌ राजकीय गणिते बदलली ; बारस्कर राष्ट्रवादीच्या तर बोज्जा सेनेच्या उमेदवार

 बारस्कर राष्ट्रवादीच्या तर बोज्जा सेनेच्या उमेदवार

नगर: महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी सर्वच राजकीय पक्षांची गणिते बदलली आहे. केडगावसह सावेडी उपनगर व शहरातील प्रभागामध्ये देखील ऐनवेळी राजकीय घडामोडीतून पक्षांतर झाले. शिवसेनेच्या विद्यमान नगरसेविका दिपाली बारस्कर यांना यापूर्वी शिवसेनेने उमेदवारी जाहिर केले असतांनाही त्यांनी ती डावलून प्रभाग 1 मधून राष्ट्रवादीचे घड्याळ हाता बांधले तर प्रभाग क्रमांक 5 मध्ये मनसेच्या नगरसेविका वीणा बोज्जा यांनी शिवसेनेकडून रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला.

-Ads-

केडगावतील राजकीय भूकंपाने शहर हादरू गेले असतांना सावेडी उपनगरात शिवसेनेच्या नगरसेविका बारस्कर यांनी उमेदवारी जाहीर होवून देखील ती नाकारून राष्ट्रवादीची उमेदवारी स्वीकारली.भाजपचे आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या तिसरी कन्या ज्योती गाडे या निवडणुकीच्या निमित्ताने राजकारण आल्या असून त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून प्रभाग 4 मधून लढण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. मनसेने डावलल्यानंतर वीणा बोज्जा या कोणत्या पक्षात जाणार याबाबत उत्सुकता होती. विशेष म्हणजे बोज्जा यांनी आपण मनसेच्या चिन्हावर निवडणूक लढणार असल्याचे जाहीर केले होते. परंतू पक्षाकडून उमेदवारी मिळण्याची शक्‍यता नसल्याने अखेर बोज्जा यांनी शिवसेनेत प्रवेश करून आज उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

बुगे यांनी भाजपची उमेदवारी नाकारली

प्रभाग क्रमांक 6 चे चारही उमेदवार भाजपने जाहीर केले आहे. या प्रभागातून विद्यमान नगरसेविका मनिषा बारस्कर – काळे यांना डावलण्यात आले असून त्यांच्या ऐवजी वंदना ताठे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. या प्रभागात आरती बुगे यांना देखील उमेदवारी देण्यात आली आहे. परंतू काळे यांना उमेदवारी देण्यात न असल्याने बुगे नाराज झाल्या असून त्यांनी आता उमेदवारी नाकारली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
21 :thumbsup: Thumbs up
5 :heart: Love
4 :joy: Joy
2 :heart_eyes: Awesome
1 :blush: Great
1 :cry: Sad
2 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)