धोरण : अवकाशयान आणि आव्हाने 

श्रीनिवास औंधकर (ज्येष्ठ खगोलशास्रज्ञ) 

गेल्या काही वर्षात इस्रोने अवकाशयान उड्डाणात उल्लेखनीय कामगिरी करत यश मिळवले आणि जगासमोर आपली क्षमता सिद्ध केली. त्यामुळे संपूर्ण अंतराळविज्ञान व्यवसायात खळबळ माजली आहे. गेल्या काही वर्षांत अमेरिकेच्या खासगी अंतराळ उद्योगातील व्यापारी आणि अधिकाऱ्यांनी इस्रोच्या कमी खर्चिक प्रेक्षपण यानामुळे खूप स्पर्धा निर्माण होत असल्याची गोष्ट सार्वजनिक चिंतेच्या स्वरूपात व्यक्त केली होती. 

अंतराळातील मानवी मोहिमांचा इतिहास पाहता आत्तापर्यंत अंतरिक्षात माणसाला पाठवण्याचा यशस्वी प्रयत्न केवळ अमेरिका, चीन आणि रशिया या देशांनीच केला आहे. अमेरिका आणि रशिया हे दोन्ही देश शीत युद्ध काळापासूनच जगावर आपले वर्चस्व गाजवण्याच्या प्रयत्नात होते. त्याचाच परिणाम म्हणून अंतराळ आणि चंद्र यांच्यावर माणसाची स्वारी. रशिया याबाबतील अव्वल होता त्याने आपला अंतराळवीर “युरी एलेकसेविच गागरिन’ला अंतराळात जाणारा पहिला माणूस बनवले. अमेरिकाही याबाबतीत यशस्वी झाली त्यांच्या अंतराळयात्रीने चंद्रावर पहिले पाऊन टाकले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

या दोन्ही यशोगाथांना आता पाच दशकाहून अधिकचा काळ लोटला आहे. या दरम्यान चीन आहे ज्याने दीड दशकांपुर्वी 15 ऑक्‍टोबर 2003 मध्ये एक चीनी नागरिक यांग लिवेई याला शिंझोऊ 5 या यानातून अंतराळात पाठवले होते. यशाच्या या यादीमध्ये भारताचे नावही सामील आहे. भारताचे स्क्वाड्रन लीडर राकेश शर्मा यांनी 2 एप्रिल 1984 मध्ये पहिला भारतीय अंतराऴवीर म्हणून अंतराळात पाय ठेवला.अर्थात यामध्ये रशिया या मित्र देशाचा वाटा होता कारण रशियाच्या सोयूज 11 या यानातून राकेश शर्मा अंतराळात पाऊल ठेवू शकले. आता मात्र भारताला स्वबळावर पुन्हा असाच इतिहास रचायचा आहे.

भारत 2022 मध्ये आपल्या तीन प्रवाशांना इस्रो निर्मित “गगनयान’ या यानातून अंतराळात पाठवणार आहे. त्यासाठी सरकारने 10 हजार कोटी रूपयांचा निधी मंजूर केला आहे. या अभियानाचा उद्देश देशातील विज्ञान आणि तंत्रज्ञानाला एका नव्या पातळीवर घेऊन जाणार आहे. तसे अंतराळशोध मोहिमेसाठी नवे मार्ग खुले होतील. मात्र हजारो कोटी रूपये खर्च होण्याव्यतिरिक्तही अनेक गोष्टींमुळे या योजनेवर प्रश्‍नचिन्ह निर्माण होते आहे.

एक गरीब आणि विकसनशील देश या नात्याने या अभियानावरही प्रश्‍नचिन्ह निर्माण होते आहे जे पहिल्या चंद्रयान आणि मंगळयान मोहिमेविषयी निर्माण झाले होते. देशातील शेतकरी आत्महत्या करतो आहे, लाखो करोडो तरूण बेकार आहेत तेव्हा अशा परिस्थितीत तीन लोकांना अंतराळात पाठवण्यासाठी आखल्या जाणाऱ्या योजनेवर दहा हजार कोटी रूपये खर्च करणे नक्कीच अवाजवी वाटते. मग प्रश्‍न असाही विचारला जाऊ शकतो की तीन लोकांना अतराळप्रवासाला पाठवणे इतके महत्त्वाचे आणि गरजेचे आहे का की लाखो लोकांच्या शिक्षणावर, वैद्यकीय उपचारांसाठी, घरासाठी, वीज, पाणी रस्ते या सर्व मूलभूत गरजांकडे दुर्लक्ष करावे.

गगनयानासाठी येणारा 10 हजार कोटी रूपयांचा खर्च जगाच्या दृष्टीने विचार करता खूप स्वस्त आहे. उदाहरणार्थ आपल्या शेजारी देश चीनने रशियाच्या मदतीने आपला नागरिक अंतराळात पाठवला. तेव्हा चीनने आपल्या मानव मिशन वर तब्बल 18 हजार 350 कोटी रूपयांएवढी रक्कम खर्च केली होती. आज अमेरिकेतील एक अंतराळ योजनेचा खर्च तब्बल 30 हजार कोटी रूपये एवढा प्रचंड असतो. तब्बल चाळीस वर्षांपुर्वी अमेरिकेने आपल्या अपोलो चंद्रयान मोहिमेवर एक लाख चाळीस हजार कोटी रूपये खर्च केले होते.

आज ही रक्कम तब्बल 7 लाख कोटी रुपयांएवढी आहे. त्याशिवाय गेल्या 57 वर्षांमध्ये अमेरिकेने आपल्या अंतराळ मोहिमांवर 34 लाख कोटी रूपये खर्च केले आहेत. दुसरीकडे रशिया आपल्या अंतराळ मोहिमांचा खर्च सार्वजनिक स्वरूपात जाहीर करत नाही. तरीही अंदाजानुसार एका अंतराळ मोहिमेवर रशिया 22 हजार कोटी रूपये खर्च करतो. या दृष्टीने पाहता गगनयानावर खर्च होणारे भारताचे 10 हजार कोटी रूपये ही रक्कम खूप मोठी नाही. महत्त्वाची गोष्ट अशी की प्राधान्यक्रम आणि या मोहिमेतून मिळणारे ठोस फायदे काय.

भारताच्या या मिशनमध्ये अंतराळ प्रवाशांना सात दिवस अंतराळात रहावे लागणार आहे. अंतराळात प्रवाशांची निवड भारतीय हवाई दल करणार आहे आणि त्यांना प्रशिक्षणासाठी परदेशात पाठवले जाईल. या मोहिमेसाठी वापरण्यात येणारे रॉकेट जियोसिन्क्रोनस सॅटेलाईट लॉन्च व्हेईकल मार्क 3 ची कमीत कमी 2 मानवरहित उड्डाणे होतील. सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही मोहिम संपूर्णपणे स्वदेशी आहे. इस्रोने याचे काही तंत्रज्ञान विकसित केले आहे. जसे इस्रोने याआधी क्रू मॉड्यूल आणि बचाव प्रणाली (एस्केप सिस्टिम) चे परीक्षण केले आहे. इतर तयाऱ्या येत्या काही टप्प्यात पूर्ण होतील.

इस्रोने मंगलयाना व्यतिरिक्त आपल्या प्रक्षेपकातून परदेशी उपग्रह अंतराळात सोडल्याने एक प्रतिष्ठा प्राप्त केली आहे. ते पाहता गगनयान या मोहिमेतून भारतीयांना अंतराळात पाठवण्याचे स्वप्न अशक्‍य नक्कीच नाही. दहा वर्षांपर्यत इस्रोचे प्रमुख असलेले यू. आर. राव यांनी एका प्रसंगी असे म्हटले होते की चीनची आव्हाने लक्षात घेता भारताला अंतराळात मानव मोहीम करण्याची गरज आहे. याचा अर्थ असा की भारताने लवकरच अशी मोहीम हाती घेतली नाही तर अंतराळ तंत्रज्ञानाच्या स्पर्धेमध्ये शेजारी राष्ट्र चीन बरोबर भारताला हार पत्करावी लागेल.

वास्तविक प्रश्‍न आहे तो अंतराळ संशोधन आणि संसाधनांच्या उपयुक्तततेचा. अमेरिका आणि रशिया यांच्यानंतर चीन या दिशेने वेगाने प्रगती करत आहे. या मोहिमेंतर्गत चीनने माणसाला अंतराळात पाठवले आता चंद्रावर माणसाला पाठवण्याची योजना चीन आखतो आहे. अंतराळ क्षेत्रात दबदबा निर्माण करण्यासाठी कोणताही चंद्र किंवा अवकाशात मानव मोहिमा आखून आपली योग्यता आणि क्षमता सातत्याने सिद्ध करून दाखवतो.

गेल्या काही वर्षांत इस्रोने अनेक यशांतून आपली क्षमता जगासमोर सिद्घ केली आहे. यामुळेच संपूर्ण अंतराळ उद्योगामध्ये एक प्रकारे खळबळ निर्माण झाली आहे. गेल्या काही वर्षांदरम्यान अमेरिकेत खासगी अंतराळ उद्योगांनी आणि अधिकाऱ्यांनी इस्रोच्या कमी खर्चिक प्रक्षेपण यानाशी करावी लागणाऱ्या कडव्या स्पर्धेची चिंता व्यक्त केली आहे.

सध्या माहिती तंत्रज्ञानापासून ते वातावरणाच्या अंदाजापर्यंत सर्वच गोष्टींसाठी व्यक्ती अंतराळात असलेल्या उपग्रहांवर अवलंबून आहोत ही गोष्ट नाकारता येणार नाही. त्यामुळे माहिती तंत्रज्ञान आणि बीपीओ उद्योगांनंतर अंतराळ प्रवास हा जगातील तिसरे क्षेत्र म्हणून समोर येत आहे.

त्यामध्ये भारताला पश्‍चिम देशांसाठी आऊटसोर्सिंग करून चांगली कमाई होत आहे. इस्रो द्वारा उपग्रह प्रक्षेपण करण्याचा खर्च इतर देशांच्या तुलनेत 30-35 टक्‍क्‍याने कमी आहे. अर्थात इस्रो या किंमतीचा खुलासा करत नसले तरीही साधारणपणे प्रति किलोग्रॅमच्या हिशोबाने शुल्क आकारते. भारतीय अंतराळ कार्यक्रमासाठी परदेशी उपग्रह आपल्या प्रक्षेपकांच्या मदतीने अंतराळात पाठवण्याचा उपक्रम हा पैसे मिळवण्याचा एक मार्ग आहे.

सद्यपरिस्थिती अशी आहे की अनेक युरोपिय देश भारतीय प्रक्षेपकाच्या माध्यमातूनच आपले उपग्रह अवकाशात सोडणे पसंत करतात. इस्रोकडून उपग्रह सोडणे त्यांना स्वस्त पडते. त्याशिवाय भारतीय प्रक्षेपकाच्या यशाची आकडेवारी खूप जास्त आहे. खासगी क्षेत्राच्या मदतीने इस्रो उपग्रह आणि प्रक्षेपक निर्मितीचा वेग वाढवण्याच्या प्रयत्नात आहे आणि त्या प्रक्षेपकांच्या मदतीने विविध देशांचे उपग्रह प्रतिस्पर्धी किंमतींवर अंतराळात सोडेल.

इस्रोचे हे यश पाहूनच अमेरिकेच्या खासगी कंपन्यांची झोप उडाली आहे. अंतराळ संशोधन आणि व्यापार या क्षेत्रात भारत नवे नवे पराक्रम करेल आणि देशाची युवाशक्तीला सखोल संशोधन कार्याकडे वळवून त्यांच्या नोकरीची अशी काळजी केली जाईल की त्यांना नोकरीच्या शोधात परदेशावर अवलंबून राहाण्याची गरज नाही.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)