पॉलिसी बझार डॉट कॉमची रोजगारनिर्मिती

पुणे-भारताचा अग्रगण्य इंश्‍योरटेक ब्रॅंड पॉलिसीबाज़ार.कॉम ने आपला 10 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला. हा ऐतिहासिक टप्पा साध्य करण्याच्या प्रसंगी, चालू आर्थिक वर्षात कंपनीने 2500 नवीन रोजगार निर्माण करण्याची घोषणा केली आहे, त्यानंतर पॉलिसीबझार.कॉममधील कर्मचाऱ्यांची संख्या 6000 होईल.पॉलिसीबाज़ार.कॉमचे लक्ष्य रु.10,000 कोटी रुपयांचा प्रीमियम अंडरराइट करणे आणि आपल्या ग्राहकांची संख्या 1 कोटींपर्यंत पोहोचवण्याबरोबरच, 2020 पर्यंत आपला महसूल वाढवून 1500 कोटी करणे हे असणार आहे. पॉलिसीबझार.कॉम मध्ये निर्माण केल्या जाणाऱ्या नोकऱ्या मुख्यतः ग्राहक सेवा विभागाशी संबंधित असतील,जेथे 2200 नवीन पदे जोडली जातील, उरलेले पोस्ट कॉर्पोरेट आणि तांत्रिक कार्यांमध्ये विभागली जातील.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)