पोलीस उपनिरीक्षकांच्या जिल्ह्याबाहेर बदल्या

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर जिल्हा पोलिस दलात फेरबदल

सातारा  लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे – पाटील यांनी सातारा जिल्ह्यातील पोलीस उपनिरीक्षकांच्या बदल्या जिल्ह्याबाहेर केल्या आहेत. त्यांच्याजागी जिल्ह्याबाहेरील पोलीस उपनिरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. बदलीचे आदेश सोमवार दि. रोजी काढण्यात आले आहेत. सातारा येथे बदली बदली होऊन येणाऱ्यामध्ये महिला पोलीस उपनिरीक्षकांचा समावेष आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

बदली झालेल्या पोलीस उपनिरीक्षकाचे नाव आणि कोठून कोठे बदली झाली आहे ते पुढीलप्रमाणे : प्रमोद भास्कर कदम, नसीमखान हमीदखान फरास, विजय शामराव चव्हाण, सुनील खंडेराव पवार, अनिल विष्णू चौधरी, रविंद्र लक्ष्मण शिंदे, विलास गोविंद कुबडे, पोपट शंकर कदम यांची सातारा येथून कोल्हापूर येथे बदली करण्यात आली आहे. मैनुद्दिन अकबर खान, प्रकाश नामदेव इंगळे, योगेश अधिकराव शेलार, दिनेश जयसिंग कुंभार यांची सातारा येथून सोलापूर ग्रामीणला बदली करण्यात आली आहे. सातारा जिल्ह्यातून बदली करण्यात आलेल्या पोलीस उपनिरीक्षकांच्या जागेवर शिवकुमार नागनाथ जाधव, अनिल रामहरी कदम, शंकर बसवंत पाटील, राजेंद्र चंद्रकांत कदम, संजय हेमंत मोतेकर यांची सोलापूर ग्रामीण येथून सातारा येते बदली करण्यात आली आहे. ज्योती रघुनाथ चव्हाण, ज्योस्ना शंकरराव भाबिष्टे, भरत तुकाराम पाटील, समीक्षा प्रकाश पाटील, उदय बाळापुर दळवी यांची कोल्हापूर येथून सातारा येथे बदली करण्यात आली आहे. परिविक्षाधीन पोलीस उपनिरीक्षकपदी राजु लक्ष्मण डांगे, प्रवीण सर्जेराव जाधव यांची बदली करण्यात आली आहे.
 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)