पुरीच्या मंदिरात पोलिसांनी शस्त्र व बुट घालून प्रवेश करू नये 

सर्वोच्च न्यायालयाचा आदेश 
नवी दिल्ली: पुरीच्या जगन्नाथ मंदिरात भाविकांच्या रांगेच्या विषयावरून झालेल्या वादाच्यावेळी तेथे मोठा हिंसाचार झाल्याची घटना 3 ऑक्‍टोबरला घडली होती. त्या अनुषंगाने आज पोलिसांना आदेश देताना न्यायालयाने म्हटले आहे की या मंदिरात कोणाही पोलिस कर्मचाऱ्याने बुट घालून आणि शस्त्रे बाळगून प्रवेश करू नये.
पोलिसांनी या मंदिरात भाविकांसाठी रांगेची नवी व्यवस्था केली आहे त्याच्या विरोधात भक्तांनी तेथे बारा तासांचा बंद पाळला होता. तसेच त्यावेळी पोलिसांवरही हल्ला करण्याचा प्रकार घडला होता. त्यात सुमारे नऊ पोलिस कर्मचारी जखमी झाले आहेत. त्यावेळी पोलिसांच्या मंदिरातील वर्तनावरही भाविकांनी आक्षेप घेतला आहे. त्या अनुषंगाने सुप्रिम कोर्टाने आज पोलिसांना हा आदेश दिला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)