रेवनाथ रेड्डींना अटक करणाऱ्या पोलिस अधिकाऱ्याची बदली

नवी दिल्ली: तेलंगणातील कॉंग्रेसचे नेते रेवनाथ रेड्डी यांना मध्यरात्री तीन वाजता अटक करणारे विकाराबादचे पोलिस अधिक्षक टी अन्नपुर्णा यांची पोलिस मुख्यालयात बदली करण्याचा आदेश केंद्रीय निवडणूक आयोगाने दिला आहे. त्यांना निवडणुकीशी संबंधीत कोणतीही ड्युटी देऊ नये अशी सुचनाही निवडणूक आयोगाने दिली आहे. त्यांनी केलेली ही अटकेची कारवाई अनावश्‍यक होती असे निरीक्षणही निवडणूक आयोगाने नोंदवले आहे.

कायदा आणि सुव्यवस्थेचे कारण देऊन पोलिसांनी तेलंगणा प्रदेश कॉंग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष रेवनाथ रेड्डी यांना अटक केली होती. या प्रकरणी कॉंग्रेसच्या वरीष्ठ नेत्यांनी दिल्लीत निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती. त्या तक्रारीची दखल घेऊन निवडणूक आयोगाने हे आदेश दिले आहेत.


-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)