पोलीस वसाहतीसाठी पालकमंत्र्यांना निवेदन

मागण्या मार्गी न लागल्यास मनसेकडून आंदोलनाचा इशारा

कुकाणे – नेवासे शहरासाठी अहोरात्र काम करणाऱ्या पोलीस क्षेत्रात, नूतन पोलीस स्टेशनसह वसाहतीचे बांधकाम सुरु करण्याच्या मागणीचे निवेदन, तालुका दौऱ्यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे पालकमंत्री ना. राम शिंदे यांना दिले.

दरम्यान कुकाणे येथील स्पर्धा परीक्षा अभ्यासिका केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. विविध मागण्या यावेळी निवेदनामध्ये करण्यात आल्या आहेत. या मागण्या मार्गी न लागल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.यावेळी मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष विलास देशमुख, नेवासे शहराध्यक्ष संतोष गव्हाणे, तालुका उपाध्यक्ष दीपक परदेशी, विभागाध्यक्ष रवि पिंपळे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)