क्रांती मोर्चाच्या पार्श्‍वभूमीवर पोलीस संचलन

सातारा – मराठा क्रांती मोर्चाच्या 9 ऑगस्टच्या नियोजित महाराष्ट्र बंदच्या पार्श्वभूमीवर सातारा शहरासह शहराच्या पूर्व भागातील आज येथील प्रतापसिंह नगरात सातारा शहर पोलिसांच्या वतीने संचलन करण्यात आले.

24 जुलै रोजी सातारा येथील मराठा आरक्षण आंदोलनात जिल्हाधिकारी कार्यालयावरील मोर्चानंतर बॉम्बे रेस्टॉरंट चौकात हिंसाचार भडकला होता. त्यात आंदोलनाच्या आडून काही समाजकंटकांनी पोलिसांना टार्गेट करून तुफान दगडफेक, तोडफोड करून सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केले होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

या दंगलीत तत्कालीन पोलीस प्रमुख संदीप पाटील यांच्यासह असंख्य पोलीस अधिकारी कर्मचारी जखमी झाले होते. या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून व गुन्हेगारांवर जरब बसावी म्हणून सातारा शहर पोलिसांकडून आज हे संचालन करण्यात आल्याचे, सातारा शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नारायण सारंगकर यांनी सांगितले. या संचलनात सातारा शहर पोलीस ठाण्याचे अधिकारी पोलीस कर्मचारी व राज्य राखीव पोलीस दलाची एक तुकडी सहभागी झाली होती. यामुळे ऑगस्ट रोजी होणाऱ्या मराठा क्रांती मोर्चाच्या बंदच्या पार्श्वभूमीवर गुन्हेगारांवर करडी नजर असणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)