पुणे शहरातही पोलिसांची सतर्कता

पुणे – पाकिस्तानकडून सीमा भागात लढाऊ विमानांच्या घुसखोरीच्या पार्श्‍वभूमीवर देशभरात अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. देशाची आर्थिक राजधानी मुंबई पाठोपाठ पुणे शहरातही सतर्कता बाळगली जात आहे. दरम्यान, शहरात ठिकठिकाणी नाकाबंदी तसेच चेकपॉईंटस तयार करण्यात आले असून संशयितांवर नजर ठेवली जात आहे, अशी माहिती पोलीस आयुक्त डॉ. के.व्यंकटेशम यांनी दिली.

पुणे रेल्वे स्टेशन, लोहगाव आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरात पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. लष्काराचे दक्षिण सदर्न कमांड, एनडीए, हवाई दलाचे प्रशिक्षण केंद्र आदी महत्त्वाच्या संरक्षणविषयक संस्था असल्यामुळे पुणे कायमच शत्रुंच्या रडारवर राहिलेले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पोलीस आयुक्त म्हणाले, शहरात संशयित वस्तू, अथवा व्यक्ती दिसून आल्यास नागरिकांनी तत्काळ पोलीस नियंत्रण कक्ष क्रमांक किंवा पुणे शहर दलाच्या व्हॉट्‌सऍप क्रमांकवर संपर्क साधून माहिती द्यावी. यासोबत शहरात विविध ठिकाणी नाकाबंदी तसेच तपासनाके तयार करण्यात आले आहेत. शहरातील संरक्षण विषयक संस्थांना योग्य ती सुरक्षा प्रदान केली आहे. यासोबतच संरक्षण दलांसोबत आम्ही कायम संपर्कात आहोत. त्यांना योग्य ती मदत केली जात असल्याचेही त्यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)