नगर: लोकसभा निवडणुकीची धामधूम सध्या सुरू असून, नगर दक्षिण मतदारसंघाचे मतदान 23 रोजी होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात एसपीसह 3 हजार 610 पोलिसांसह एसआरपीच्या 4 तुकड्या तैनात असणार असल्याचे पोलीस अधीक्षक ईशू सिंधू यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
यामध्ये पोलीस अधीक्षक-1, अतिरिक्त पोलीस अधीक्षक -2, पोलीस उपअधीक्षक-7, पोलीस निरीक्षक -15, सहायक पोलीस निरीक्षक 85, पोलीस शिपाई- 2 हजार 500, एक हजार होमगार्डसह एसआरपीच्या 4 तुकड्या निवडणुकीसाठी बंदोबस्त बजावणार आहेत. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी पोलीस प्रशासनाच्या वतीने मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. दृष्टीने संपूर्ण तयारी करण्यात आली असून, पुरेसा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. सखी मतदान केंद्रावर महिला पोलीस, कर्मचारी नियुक्त करण्यात आले असल्याचेही त्यांनी सांगितले.