कोल्हापूरात मालदीव, तामीळनाडू, मध्य प्रदेशमधून पोलीस फोर्स

लोकसभा निवडणुकीसाठी मोठा बंदोबस्त

कोल्हापूर: कोल्हापूर व हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीसाठी मतदानादिवशी सुमारे 6100 पोलीस कर्मचारी व होमगार्ड बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. मालदीव तामीळनाडू आणि मध्य प्रदेशमधून मोठ्या संख्येने पोलिसांचा बंदोबस्त कोल्हापुरात दाखल झाला आहे. याव्यतिरिक्त संवेदनशील केंद्रावर राज्य राखीव दल (एसआरपी) आणि केंद्रीय निमलष्करी दल (एसएएफ) 600 जवान तैनात करण्यात आले आहेत. हा सर्व बंदोबस्त आजपासून नियुक्तीच्या ठिकाणी पाठवण्यात आला आहे.

कोल्हापूर व हातकणंगले लोकसभा मतदारसंघांसाठी जिल्हा पोलीस दलाच्या वतीने पोलीस बंदोबस्ताचे नियोजन करण्यात आले. यासाठी जिल्ह्यात 3321 मतदान बूथ, तर 57 तात्पुरते बूथ राहणार आहेत. बूथच्या 1842 इमारतीमध्ये 1998 पोलीस कर्मचारी व 1323 होमगार्ड बंदोबस्तासाठी राहणार आहेत. याशिवाय मतदान इमारतीच्या 100 मीटर परिसरातील बंदोबस्तासाठी 462 अतिरिक्त पोलीस आहेत. जिल्ह्यात एक पोलीस अधीक्षक, दोन अप्पर पोलीस अधीक्षक, 10 उपअधीक्षक, 40 पोलीस निरीक्षक, 160 पोलीस उपनिरीक्षक, 5300 पोलीस, 1800 होमगार्ड बंदोबस्तासाठी तैनात राहणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)