रेड सॅण्डबो जातीचे 30 लाखांचे मांडूळ ताब्यात
कराड – मांडुळाची तस्करी करणाऱ्या दोघांना कराड तालुका पोलिसांनी सापळा रचून ताब्यात घेतले. ही कारवाई रविवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास मालखेड ता. कराड गावच्या हद्दीत सम्राट लॉजच्या समोर मोकळ्या जागेत केली. त्यांच्याकडून सुमारे तीस लाख रूपये किमतीचे एक रेड सॅण्डबो जातीचे मांडूळ व एक दुचाकी असा सुमारे तीस लाख तीस हजारांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला आहे.
मांडूळ तस्करी करणाऱ्या पांडुरंग भगवान शिंदे (वय 34), जयवंत शंकर ताटे (वय 33, दोघेही रा. कासेगाव ता. वाळवा, जि. सांगली)यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी सांगितले की, मालखेड ता. कराड येथील सम्राट लॉजच्या परिसरात दोघेजण मांडुळाची तस्करी करत असल्याची बातमी पोलिसांना समजली. मालखेड येथील सम्राट लॉज परिसरात पोलिसांनी