पोलीस कर्मचाऱ्यावर बलात्काराचा गुन्हा

पोलीस अॅॅकॅडमीमधील तरुणीकडून फिर्याद

पुणे – पोलीस मुख्यालयातील पोलीस कॉन्स्टेबलवर बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी सणस ग्राऊंडवर पोलीस अकादमीत कामाला असलेल्या एका तरुणीने फिर्याद दिली आहे.

-Ads-

कृष्णा जयराम फुले (24, रा. शिवाजीनगर पोलीस मुख्यालय) असे आरोपीचे नाव आहे. त्याच्याविरुध्द भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. ही घटना ऑगस्ट 2017 ते ऑगस्ट 2018 दरम्यान पुणे-सातारा रस्त्यावरील अश्‍विनी लॉज येथे घडली. आरोपीने फिर्यादीला लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक अत्याचार केला. मात्र तिच्याशी विवाहास नकार दिला. तिने विवाह करण्याचा तगादा लावला असता तिला शिवीगाळ व हाताने मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक व्ही. ए. भोसले तपास करत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)