पुणे – आधी ऐकणार, मग करुन दाखवणार

पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम : प्रत्येक सूचनेची घेतली जाणार दखल

व्हॉटस्‌ अॅॅप नंबर जाहीर 8975283100 

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पुणे – नवनियुक्त पोलीस आयुक्त के.व्यंकटेशम यांनी पुणेकर नागरिकांसाठी व्हॉटस्‌ अॅॅप नंबर खुला केला आहे. सामाजिक प्रश्‍नांबद्दल नागरिक थेट आयुक्‍तांना यावरून सूचना देऊ शकणार आहेत. या प्रत्येक सूचनेचे विश्‍लेषण करुन त्याची दखल घेतली जाणार आहे. 8975283100 असा हा क्रमांक आहे. या व्हॉटस अॅॅप नंबरवर वैयक्तीक प्रश्‍न मात्र टाकता येणार नाही. दरम्यान डॉ.के.व्यंकटेशम यांनी पुढील काही दिवस आपण फक्त सूचना ऐकणार आहोत. त्यानंतर प्रत्यक्ष करुन दाखवणार, असे सूचक वक्‍तव्य केले.

नवनियुक्त पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम्‌ यांनी शुक्रवारी पदभार स्वीकारला. यानंतर त्यांनी पोलीस आयुक्तालयातील सर्व विभागाची माहिती घेतली. तर, सोमवारी त्यांनी पुण्यातील माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. यावेळी त्यांनी “आपण काहीही बोलणार नसून फक्त शहरातील गुन्हेगारी व समस्यांविषयी जाणून घेणार,’ असे स्पष्ट केले. त्याप्रमाणे तब्बल 41 सूचना त्यांना प्राप्त झाल्या. यामध्ये वाहतूक तसेच सायबर क्राइमबद्दल सर्वाधिक सूचना आहेत. पुढील काही दिवसांत आयुक्‍त स्वत: पोलीस ठाणे अधिकारी व नागरिकांशी संवाद साधणार आहेत.

हेल्मेट नसल्याने अपघातात मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्या जास्त आहे. यामुळे हेल्मेटचा वापर महत्वाचा असल्याचे सांगत ती बंधनकारक करणार का? यावर मात्र त्यांनी मौन बाळगले. तसेच वाहतूक कोंडी व सायबर पोलीस ठाण्याच्या सूचनांवर याचा अभ्यास करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले. घरफोडी आणि सोनसाखळी चोरी घटनांसंदर्भात काम सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

नागरिकांनो, तुम्हीच रोखा वाहनचोरी
वाढती वाहनचोरी रोखण्यासंदर्भात डॉ. व्यंकटेशम्‌ म्हणाले, “नागरिक 60 ते 70 हजार रुपयांची महागडी दुचाकी विकत घेतात. मात्र हजार-पाचशे रुपयांचे रुपयांच्या “लॉकिंग सिस्टीम’वर खर्च करत नाहीत. यामुळे गाडी चोरीला जातेच, मात्र तपास अधिकाऱ्याचाही महत्वाचा वेळ जातो.’

पुण्यात “नागपूर पॅटर्न’ नव्हे, तर “एक्‍सपिरियन्स’
पुणे शहरात “नागपूर पॅटर्न’ नव्हे, तर नागपूरचा “एक्‍सपिरियन्स’ वापरला जाईल. येथे गुन्हेगारीवर नियंत्रण व नागरिकांना चांगली सेवा देण्यात येईल. गुन्हेगारांच्या मनात 100 टक्के भीती असेल, तर पोलीस हे चांगल्या लोकांसाठी उपलब्ध असतील, असे आयुक्‍त म्हणाले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)