वाद मिटवण्यासाठी आलेल्या पोलीसाला पोलिसाकडून मारहाण

तो पोलीस कर्मचाऱ्यारी तात्काळ निलंबीत

नगर: सुनेने दिलेल्या तक्रार अर्जाबाबत समुपदेशन चालू असताना पोलीस हवालदाराने दिलासा सेल मध्येच सुनेला तिच्या नातेवाईकांना मारहाण केली. वाद मिटवण्यासाठी आलेल्या दिलासा सेल मधील इतर पोलीस कर्मचाऱ्यांना ही सदर पोलीस हवालदाराने धक्काबुक्की केल्याची धक्‍कादायक बाब पोलिसांनी केलेल्या चौकशी अहवालातून स्पष्ट झाली आहे.
याबाबत समजलेली माहिती अशी की, सासरच्या लोकांकडून शारीरिक व मानसिक त्रास दिला जात असल्याची तक्रार पोलीस हवलदार त्यांच्या सुनेने पती, सासू, सासरे यांच्याविरुद्ध पोलिसांच्या दिलासा सेलमध्ये केले होती. या तक्रार अर्जाच्या अनुषंगाने हवालदार बरडे यांना वारंवार अर्ज चौकशीच्या अनुषंगाने बोलाविण्यात आले होते. परंतु ते उपस्थित राहत नव्हते. अखेर सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांच्यामार्फत हजर राहण्याचा आदेश देण्यात आला होता. त्यावरून 9 एप्रिल रोजी दुपारी दिलासा सेलच्या कार्यालयात पोलीस हवालदार बेरड उपस्थित होते.

त्यावेळी समुपदेशन चालू असताना पोलीस हवालदार बेरड याने सुनेच्या डोक्‍यात खुर्ची मारली. त्यामुळे दिलासा सेलमध्ये चांगलाच गोंधळ उडाला. सदर पोलीस हवालदाराने सुनेच्या नातेवाईकांनाही मारहाण केली. मारहाण करणाऱ्या पोलीस हवालदाराला धरण्यासाठी सेलमधील इतर पोलीस कर्मचारी तेथे दाखल झाले. त्या पोलीस कर्मचाऱ्यांनाही बेरड यांनी शिवीगाळ, दमदाटी व धक्काबुक्की केली. पोलीस अधीक्षक ईशू सिंधू यांनी त्या पोलीस कर्मचाऱ्याला तत्काळ निलंबित करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)