सुरत- काही दिवसांपूर्वी गुजरात राज्यातील सुरतमधील तक्षशिला नावाच्या एका इमारतीला भीषण आग लागली होती. या अग्नितांडवात २० विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू झाला तर. २० जण गंभीर जखमी झाले आहेत. दरम्यान, याप्रकणी काँग्रेस नेते ‘हार्दिक पटेल’ यांनी आता चेतावणी दिली आहे. ‘गुजरात सरकाने सुरतचे महापौर आणि इतर अधिकाऱ्यांविरोधात या अग्नितांडव प्रकरणी जर कोणतीही कारवाई केली नाही तर, मी उपोषणाला बसेल’. असं हार्दिक पटेल बोलले होते. मात्र, आता त्यांच्या अश्या बोलण्यामुळे सुरत पोलिसांनी हार्दिक पटेल यांना ताब्यात घेतलं आहे.