पीएनजी ज्वेलर्सचा स्तुत्य उपक्रम 

एक लाख रुपयांत एक्‍सक्‍लुझिव्ह डायमंड ज्वेलरी 

पुणे: पीएनजी ज्वेलर्स तर्फे डायमंड नेकपीसेसच्या खास श्रेणीचे अनावरण करण्यात आले. डायमून या डायमंड सेगमेंटमध्ये हे सर्वांत नवीन अद्ययावत नेकलेस डिझाईन असलेले उत्पादन आहे.

हिऱ्याला महिलांचा सर्वांत जवळचा मित्र म्हणतात, महिलांचे हिऱ्यासाठीचे प्रेम शब्दांत मांडता येत नाही. हिरा हा महिलांसाठी अद्वितीय आणि मौल्यवान असतो. हिरा म्हणजे चांद का तुकडा म्हटले तरी ते वावगे ठरणार नाही.
म्हणून डायमून हे नाव आम्ही या नवीन दागिन्यांना देत आहोत. पीएनजी तर्फे नवीन आलेल्या दागिन्यांमध्ये नाजूक नेकलेसचा समावेश आहे, जो महिला ऑफिसला जाताना तर वापरूच शकतात. शिवाय पार्टीमध्ये देखील मिरवू शकतात. आताच्या स्वावलंबी महिलांचा विचार डोक्‍यात ठेवून या दागिन्यांना घडविण्यात आले आहे.

याप्रसंगी बोलताना पीएनजी ज्वेलर्सचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक सौरभ गाडगीळ म्हणाले की, या क्षेत्रात भारतीय स्त्रियांच्या आवडी सतत विकसित होत आहेत. हल्लीच्या काळात ते डायमंड ज्वेलरीला पसंती दाखवत आहेत, कारण डायमंडचे दागिने मोहक व चमकदार दिसतात. आमचे नवीन डायमंड नेकलेसेस हे फक्त कुठल्या एका प्रसंगासाठी मर्यादित नाहीत. त्यांनी असेही सांगितले की, त्याशिवाय त्यांचे मूल्य एमआरपीवर आधारित ठेवले आहेत आणि त्यामध्ये घडणावळ व इतर कुठलेही अतिरिक्त शुल्क नाही. मला खात्री आहे की, हे नाजूक डायमंड नेकपीसेस आमच्या ग्राहकांना नक्कीच आवडतील. आम्ही नेहमीच आमच्या ग्राहकांच्या मागणीनुसार डिझाईन्समध्ये अभिनवता आणण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे ग्राहक टिकून राहतात.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)