रिंगरोडचे काम लवकरच मार्गी

पुणे – पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) पहिल्या टप्प्यात पुणे-सातारा महामार्ग ते नगर महामार्ग यांना जोडणारा रिंगरोडचे काम हाती घेतले आहे. पहिल्या टप्प्यातील रिंगरोड हा सुमारे 33 किलोमीटर लांबीचा आहे. सध्या 16 किलोमीटरची जागा ताब्यात आली आहे. उर्वरित जागा “टीपी स्कीम’च्या माध्यमातून ताब्यात घेण्यात येईल. रिंगरोडचे काम लवकरच मार्गी लागेल, असा विश्‍वास पालकमंत्र्यांनी व्यक्त केला आहे.

पुणे व पिंपरी-चिंचवड शहरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी रिंग रोड होणे आवश्‍यक आहे. हा एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. “पीएमआरडीए’च्या रिंगरोडची एकूण लांबी 128 किमी आहे. पहिल्या टप्प्यात आंबेगाव खुर्द ते वाघोली असा 33 किमीचा रिंगरोड होणार आहे. यातील 16 किलोमीटर रिंगरोडची जागा पीएमआरडीएच्या ताब्यात आली आहे. रिंगरोडसाठी पीएमआरडीएकडून “टीपी स्कीम’ हे मॉडेल राबविण्यात येत आहे. उर्वरित जागा “टीपी स्कीम’मधून उपलब्ध होईल, अशी माहिती बापट यांनी दिली.


-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
1 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)