पीएमआरडीएचा प्रारूप विकास आराखडा मार्चपर्यंत

पुणे- पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) हद्दीचा विकास आराखडा तयार करण्याच्या अनुषंगाने सिंगापूर शासनाच्या वतीने सुरबाना जूरोंग संस्थेच्या पथकाकडून भौगोलिक क्षेत्राची पाहणी करण्यात आली. दरम्यान, मार्च -2019 पर्यंत प्रारूप विकास आराखडा तयार करण्यात येणार असल्याची माहिती आयुक्त किरण गित्ते यांनी दिली.

विकास आराखड्यातील संभाव्य स्थळांची पाहणी केल्यानंतर मुख्य सभागृहामध्ये सुरबाना जूरोंग आणि पीएमआरडीएचे अधिकारी यांची संयुक्त बैठक गुरूवारी झाली. यावेळी आयुक्त गित्ते, महानगर नियोजनकार विवेक खरवडकर, सुरबाना जूरोंग संस्थेचे संचालक आनंदन करुणाकरण, क्रिसिल संस्थेचे प्रकल्प व्यवस्थापक रीदल दमाणी आदी मान्यवर उपस्थित होते.

-Ads-

पीएमआरडीए हदीतील नगरपरिषद क्षेत्र, म्हाळुंगे नगर रचना योजना, विशेष आर्थिक क्षेत्र, औद्योगिक विकास क्षेत्र, प्रदेशातील धरण क्षेत्र, पश्‍चिम घाट क्षेत्र, पुणे-मुंबई द्रूतगती मार्ग परिसर, टाऊनशिप आदी क्षेत्र अग्रस्थानी ठेऊन या विकसनशील क्षेत्राची विशेष करून पाहणी करण्यात आली.

गित्ते म्हणाले, संयुक्त कार्यशाळेमध्ये प्रदेश विकास आराखडा तयार करण्यासाठी सिंगापूर पथकाला एक कालबद्ध कार्यक्रम देण्यात आला. याप्रमाणे ऑगस्टपर्यंत सामाजिक व आर्थिक सर्वेक्षण अहवाल, ऑक्‍टोबर महिन्यापर्यंत कन्सेप्ट प्लॅन आणि मार्च 2019 पर्यंत प्रारूप विकास आराखडा तयार करण्यात येणार आहे.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)