पुणे – लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या तब्बल 724 बसेस पाठविण्यात येणार असल्याची माहिती पीएमपीएमएल प्रशासनाच्या वतीने देण्यात आली.
लोकसभा निवडणुकीसाठी पुण्यासह बारामती, मावळ, शिरूर या मतदारसंघांसाठी दि. 23 आणि 29 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर दि. 22 आणि 23 रोजी 361 बसेस तर दि. 28 आणि 29 रोजी 363 बसेस पाठवण्याचा निर्णय घेतला आल्याचे यामध्ये नमूद करण्यात आले. पीएमपीएमएलच्या ताफ्यामध्ये असणाऱ्या 1974 बसेसपैकी 1374 बसेस पीएमपीच्या मालकीच्या आहेत; तर 577 बसेस कंत्राटी आणि 25 ई-बसेस आहेत. या एकूण 1974 बसेसपैकी 724 बसेस निवडणुकीसाठी पाठवल्यानंतर 1250 बसेस शहरामध्ये प्रवाशांना उपलब्ध होणार आहेत.