‘पीएमपी’च्या मोफत प्रवास योजनेला ‘नकारघंटा’

पुण्याचा होकार, पिंपरीचा नकार : योजनेचे भवितव्य अधांतरी राहण्याची शक्‍यता

पिंपरी – पीएमपीकडे अधिकाधिक प्रवासी आकृष्ट व्हावेत, यासाठी दर महिन्याला एक याप्रमाणे वर्षांला 12 दिवस पीएमपीतून मोफत प्रवासाची योजना पीएमपीने आखली. यासाठी पुणे महापालिकेने हिरवा कंदील दाखवला असला तरी, पिंपरी पालिकेने मात्र नकारघंटा दर्शवली आहे. एका पालिकेचा होकार व दुसऱ्याचा नकार राहिल्यास या योजनेचे भवितव्य अधांतरी राहण्याची शक्‍यता व्यक्त करण्यात येत आहे.

दोन्ही पालिकांची सहमती आवश्‍यक

पुणे महापालिकेने ही योजना लागू करण्यास मान्यता दिली आहे. तथापि, पिंपरी-चिंचवड महापालिकेचा अंतिम निर्णय येत्या 20 डिसेंबरच्या महासभेत होण्याची शक्‍यता आहे. सन 2016 पासून हा विषय चर्चेत आहे. योजनेच्या अंमलबजावणीसाठी पिंपरी पालिकेची संमती आवश्‍यक आहे. त्याखेरीज अंमलबजावणी अशक्‍य आहे, असे पीएमपीएमएलचे विभागीय अधिकारी संतोष माने यांनी सांगितले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पीएमपीच्या माध्यमातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढावी, यासाठी प्रोत्साहन म्हणून महिन्याला एक याप्रमाणे वर्षांला 12 दिवस मोफत प्रवासाची मुभा देणारी ही योजना 2016 पासून चर्चेत आहे. पुणे महापालिकेने त्यास यापूर्वीच मान्यता दिली आहे. तथापि, पिंपरी पालिकेची संमती आवश्‍यक आहे. ती अजून मिळालेली नाही. यासंदर्भात, पुणे महापालिकेने 17 ऑक्‍टोबर 2018 ला पिंपरी पालिकेला एक पत्र पाठवून या योजनेबाबत कळवले होते.

मोफत प्रवासाची ही योजना लागू केल्यास साधारणपणे पीएमपीची प्रवासी संख्या तिपटीने वाढेल, असे गृहीत धरण्यात आले आहे. त्यानुसार, दर महिन्याला तीन कोटी अतिरिक्त खर्च होणार आहे. यासाठी पुणे पालिकेने सुमारे 20 कोटी तर पिंपरी पालिकेने सुमारे साडेचौदा कोटी रुपये संचलनतूट पीएमपीला अदा करणे अपेक्षित आहे. या खर्चास पुणे महापालिकेने मान्यता दिली. तथापि, पिंपरी पालिकेची नकारघंटा दिसून येते. स्थायी समितीने याबाबतचा निर्णय सर्वसाधारण सभेच्या निर्णयावर अवलंबून ठेवला असून सर्वसाधारण सभेने स्थायी समितीचाच निर्णय कायम ठेवल्यास या योजनेचे भवितव्य अधांतरी राहणार आहे.

“स्थायी समितीत याबाबतचा प्रस्ताव मांडण्यात आल्यानंतर सदस्यांनी हा विषय फेटाळला. अंतिम निर्णय सभेने घ्यावा, अशी शिफारस स्थायी समितीने केली होती. त्यानुसार, येत्या 20 डिसेंबरला होणाऱ्या सभेच्या विषयपत्रिकेवर हा प्रस्ताव आहे.
– विलास मडिगेरी, सदस्य, स्थायी समिती, पिंपरी महापालिका.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)