पीएमपीची कामचुकार वाहकावर नजर

पुणे – मार्गावर असलेली बस बंद पडल्यास वाहक आणि ड्रायव्हर त्याचठिकाणी वेळ घालवतात. काहीवेळा बसदुरुस्तीसाठी अनेक तास लागत असल्याने या कालावधीत दोघांचेही काम बुडते. मात्र, आता अशा प्रकाराला आळा बसणार असून बंद बस दुरुस्त होईपर्यंत वाहकाला जवळील डेपोमध्ये जाऊन दुसरे काम करावे लागणार आहे. असे आदेश प्रशासनाकडून  देण्यात आले आहेत.

पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) ताफ्यातील एकूण बसेसपैकी 653 बसेस ठेकेदारांकडून भाडेतत्वावर चालवल्या जातात. भाडेतत्वार घेण्यात आलेल्या बसचे संचलन पीएमपीच्या वतीने करण्यात येते. यामध्ये वाहक हा पीएमपीचा तर चालक ठेकेदारांचा असतो. गेल्या काही दिवसांपासून ठेकेदारांच्या बसेस मार्गावर बंद पडण्याचे प्रमाण वाढले आहे. अशातच ठेकेदारांच्या बस मार्गावर बंद पडल्यानंतर दिवसभर तेथेच उभ्या राहात असल्याचे निदर्शनास आले आहे. यामुळे बसेसचे चालक आणि वाहकही त्याचठिकाणी तासंतास उभे राहातात. मात्र, प्रशासनाच्या हे लक्षात येऊन याची दखल घेण्यात आली आहे. यामुळे बस बंद पडल्यानंतर ती दुरुस्त होण्याची वाट न पाहता वाहकाने तत्काळ जवळच्या डेपोत जाण्याची सूचना देण्यात आली आहे. संबंधित डेपो मॅनेजरला हे सांगून तो देईल ते कामही त्याला करावे लागणार आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

स्थानकवरील कंट्रोलरला सूचित करावे लागणार
याबाबत वाहतूक व्यवस्थापक दत्तात्रय माने म्हणाले, पीएमपीच्या स्वमालकीच्या बस मार्गावर बंद पडल्यास लगेच ती बदलून दुसरी मार्गावर सोडण्यात येते. मात्र ठेकेदारांचे तसे नसून मार्गावर बस बंद पडल्यानंतर दिवस दिवस त्याच जागी उभी राहते. यामुळे वाहकाचे काहीच काम होत नाही. यामुळे ठेकेदारांच्या बसवरील वाहकांना जवळील बस स्थानकात जावून प्रवाशांना स्टॅंड बुकींगद्वारे तिकीट देणे तसेच आदी काम करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. भाडेतत्वरील बस मार्गावर बंद पडल्यानंतर पहिल्यांदा या वाहकाने पीएमपीच्या वायरलेस विभागाला बसची माहिती देवून स्थानकावरील कंट्रोलर यांना सूचित करावे लागणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)