सुरळीत कामकाजाला पालकत्वाचे “जॅक’

मार्गावर बससंख्या वाढवण्यासाठी पीएमपीकडून प्रयत्न : वरिष्ठ अधिकाऱ्यांना आगारांची जबाबदारी

पुणे – पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) अनेक बसेस ब्रेकडाऊन, मेटेंनन्सअभावी बंद राहतात. अशा बसेस मार्गावर न धावल्याने पीएमपीच्या उत्पन्नावर परिणाम होऊन प्रवाशांचीही गैरसोय होते. गेल्या काही दिवसांत यामध्ये यात वाढ झाली आहे. प्रशासनाने ही बाब गंभीरतेने घेतली असून डेपोंवर लक्ष ठेवण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांना आगारांचे पालकत्व दिले आहे. नेमणूक झालेल्या अधिकाऱ्यांकडून सातत्याने डेपोंची पाहणी, बसेसची देखभाल दुरुस्ती आदींबाबत मार्गदर्शन करून लक्ष ठेवण्यात येणार आहे.

-Ads-

महामंडळाच्या बसेसमध्ये ब्रेकडाऊनचे प्रमाण वाढल्याने याचा परिणाम प्रवासी आणि उत्पन्नावर झाला आहे. यासाठी डेपोतील कामकाजावर लक्ष ठेवण्यासाठी वरिष्ठ आणि अनुभवी 13 अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. डेपो मॅनेजरशी सुसंवाद ठेवत कामाची गती वाढवून पर्यायाने उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न केला जाणार आहे. अधिकाऱ्यांकडून डेपोतील दैनंदिन कामकाजाचा आढाव घेतला जाणार आहे. काही दिवासांपूर्वी पीएमपी अध्यक्षा नयना गुंडे यांनी सर्व डेपो प्रमुखांची बैठक घेऊन मार्गावरील बस संख्या वाढवण्याच्या सूचना केल्या होत्या. मात्र, यानंतरही व्यवस्थेत बदल दिसून आला नाही. यामुळे पालकत्त्वाचा प्रयोग राबविण्यात येत आहे. दरम्यान, नेमून दिलेल्या अधिकाऱ्यांनी आठवड्यात काय काम केले याचा आढावा दर सोमवारी सादर करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.

ही कामे पाहणार अधिकारी
– आठवड्यातून एकदा डेपोला भेट देणे
– कर्मचाऱ्यांना येणाऱ्या अडचणी, समस्या सोडविणे
– ठरवून दिलेले काम वेळेत होते की नाही याची पाहणी करणे
– सर्व डेपोत सुरू असलेली रात्रपाळीच्या कामांवर लक्ष ठेवणे
– मार्गावरील बसची संख्या वाढवण्यासाठी डेपो मॅनेजरशी संवाद
– ब्रेक डाऊन व बस स्वच्छता यावर भर
– गरज पडल्यास अचानक भेट देऊन पाहणी

What is your reaction?
1 :thumbsup:
0 :heart:
1 :joy:
1 :heart_eyes:
1 :blush:
1 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)