कुमारांची टेनिस लीग स्पर्धा : मेट्रोसिटी रेजिंग बुल्स संघाचा विजय

पुणे – मेट्रोसिटी रेजिंग बुल्स संघाने रायजिंग ईगल्स संघाचा 40-36 असा पराभव केला आणि पुणे मेट्रोपोलिटन जिल्हा टेनिस संघटना(पीएमडीटीए) आयोजित कुमारांच्या पीएमडीटीए टेनिस लीग स्पर्धेत विजयी घोडदौड राखली.

डेक्कन जिमखाना व पीवायसी हिंदू जिमखानावर या स्पर्धेतील सामने आयोजित करण्यात आले आहेत. साखळी फेरीत मेट्रोसिटी रेजिंग बुल्सच्या शार्दूल खवलेने वर्षाखालील मुलांच्या गटात वरद उंद्रेचा 4-0 असा तर मुलींच्या गटात स्वानीका रॉयने आरोही देशमुखचा 4-2 असा पराभव करीत संघाला आघाडी मिळवून दिली. 12 वर्षाखालील मुलांच्या गटात अव्दिक नाटेकरने पृथ्वीराज हिरेमठ याचा 6-2 असा पराभव केला. 14 वर्षाखालील मुलांच्या गटात अर्णव कोकणेने अनन्मय उपाध्याय याचा 6-0 असा तर मुलींच्या गटात संहिता नगरकरने सानिका लुकतुकेचा 6-3 असा पराभव केला.

कुमार दुहेरी गटात जय पवार व जश शहा यांनी दिव्यांक कवितके व पार्थ काळे यांचा 6-3 असा पराभव करीत संघाला विजय मिळवून दिला.

स्पर्धेचा सविस्तर निकाल :

साखळी फेरी : मेट्रोसिटी रेजिंग बुल्स वि.वि इन्टेंसिटी टेनिस अकादमी रायजिंग ईगल्स: 40-36 (एकेरी: 8 वर्षाखालील मिश्र गट: नील देसाई पराभूत वि स्मित उंद्रे 2-4. 10 वर्षाखालील मुले: शार्दूल खवले वि.वि वरद उंद्रे 4-0. 10 वर्षाखालील मुली: स्वानीका रॉय वि.वि आरोही देशमुख 4-2. 12 वर्षाखालील मुले: अव्दिक नाटेकर वि.वि पृथ्विराज हिरेमठ 6-2; 12 वर्षाखालील मुली: प्रिशा शिंदे पराभूत वि देवांशी प्रभुदेसाई 1-6; 14 वर्षाखालील मुले: अर्णव कोकणे वि.वि अनन्मय उपाध्याय 6-0. 14 वर्षाखालील मुली: संहिता नगरकर वि.वि सानिका लुकतुके 6-3. कुमार दुहेरी गट: जय पवार/ जश शहा वि.वि दिव्यांक कवितके/पार्थ काळे 6-3; 14 वर्षाखालील दुहेरी गट: शौर्य राडे/देवेन चौधरी पराभूत वि आर्यन हुड/ अनिश रांजळकर 1-6. 10 वर्षाखालील दुहेरी गट: अथर्व येलभर व आरूष देशपांडे पराभूत वि शौर्य घोडके व अहान सारस्वत 0-4. मिश्र दुहेरी गट: नितिशा देसाई व आदित्य ठोंबरे पराभूत वि राजलक्ष्मी देसाई व शिवतेज शिरफुले 4-6.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)