विपार स्पीडिंग चिताज संघाचा बाद फेरीत प्रवेश

पीएमडीटीए ज्युनियर टेनिस लीग स्पर्धा

पुणे – पुणे मेट्रोपोलिटन जिल्हा टेनिस संघटना(पीएमडीटीए) यांच्या तर्फे आयोजित पीएमडीटीए ज्युनियर टेनिस लीग स्पर्धेत साखळी फेरीत विपार स्पीडिंग चिताज संघाने पुणे ओपन स्ट्रायकिंग जॅगवॉर्स संघाचा 44-30 असा पराभव करत सलग चौथ्या विजयासह बाद फेरीत प्रवेश केला.

डेक्कन जिमखाना व पीवायसी हिंदू जिमखाना टेनिस कोर्टवर सुरू असलेल्या या स्पर्धेत साखळी फेरीत विपार स्पीडिंग चिताज संघाने पुणे ओपन स्ट्रायकिंग जॅगवॉर्स संघाचा 44-30 असा पराभव करत सलग चौथ्यांदा विजय मिळवत बाद फेरीत प्रवेश केला. 8 वर्षाखालील मिश्र गटात नमिष हुडने अचिंत्य कुमारचा 4-0 असा एकतर्फी पराभव करत विजयी सुरुवात केली. 12 वर्षाखालील मुलींच्या गटात सलोनी परीदाने वैष्णवी सिंगचा 6-0 असा पराभव केला. 14 वर्षाखालील मुलांच्या गटात ईशान देगमवारने मोक्ष सुगंधीचा 6-3 असा तर मुलींच्या गटात अलिना शेखने शान्या हटणकरचा 6-0 असा पराभव करत संघाला विजय मिळवून दिला.

14 वर्षाखालील दुहेरी गट गटात केयूर म्हेत्रे व अदनान लोखंडवाला यांनी आदित्य राय व आदित्य भट्टेवारा यांचा 6-4 असा तर 10 वर्षाखालील दुहेरी गटात वेद मोघे व रियान माळी या जोडीने दक्ष पाटील व मनन अगरवाल यांचा 4-2 असा पराभव केला. मिश्र दुहेरी गटात श्रावणी पत्की व विश्‍वजीत सनस या जोडीने सिमरन छेत्री व अभिनीत शर्मा यांचा 6-1 असा पराभव करत संघाला विजय मिळवून दिला.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)