पंतप्रधान तुमचा मुख्यमंत्री आमचा; युतीसाठी शिवसेनेची नवी अट 

मुंबई – काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील जागा वाटपाची बोलणी अंतिम टप्प्यात असताना शिवसेना – भाजपची युती होणार की नाही याबाबत संदिग्धता कायम आहे.असे असतानाही जागा वाटपाचा फॉर्म्युला निश्चित झाल्याचा दावा भाजप वारंवार करत आहे. तर शिवेसेनाही त्यांचे दावे खोडून काढत आहे. अशातच शिवसेना नेते संजय राऊत यांनी केंद्रात पंतप्रधान तुमचा तर राज्यात मुख्यमंत्री आमचा अशी भूमिका घेतली आहे.

संजय राऊत म्हणाले कि, एनडीएने २०१९मध्ये सत्ता स्थापन केल्यास त्यात शिवसेना, अकाली दल आणि एनडीएतील मित्रपक्षांची महत्त्वाची भूमिका असेल. एनडीएतील मित्रपक्ष त्यांच्या त्यांच्या राज्यात अतिशय भक्कम स्थितीत आहेत. त्यामुळे भाजपाला जर केंद्रात मित्रपक्षांचा पाठिंबा हवा असेल, तर त्यांनी मुख्यमंत्रीपद मित्रपक्षांसाठी सोडावे,’ असे त्यांनी म्हंटले आहे. संजय राऊत यांच्या मागणीनंतर भाजप काय भूमिका घेणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

https://twitter.com/ANI/status/1095947152445063169

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)