‘पीएम नरेंद्र मोदी’ बायोपिकचा फर्स्ट लुक प्रदर्शित

जानेवारी महिन्यात अनेक राजकीय नेत्यांचे बायोपिक बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालणार आहेत. बड्या नेत्यांच्या या बायोपिक्सच्या यादीमध्ये आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बायोपिकची देखील भर पडली असून ‘पीएम नरेंद्र मोदी’ हा नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारित असलेला बायोपिक या महिन्याच्या अखेरीस चित्रपटगुहांमध्ये झळकणार आहे. ‘पीएम नरेंद्र मोदी’ या बायोपिकचा पोस्टर आज रिलीज करण्यात आला असून या पोस्टरद्वारे विवेक आनंद ओबेरॉय हा मोदींची भूमिका साकारणार असल्याचे उघड करण्यात आले आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज ‘पीएम नरेंद्र मोदी’ या चित्रपटाचा पोस्टर लाँच करण्यात आला असून या पोस्टरवर मोदींच्या पोशाखात उभा असलेला विवेक ओबरॉय हुबेहूब मोदींप्रमाणे दिसत असल्याने या चित्रपटाबाबत उत्कंठा आणखीनच वाढीस लागत आहे. या बायोपिकच्या दिग्दर्शनाची धुरा ओमंग कुमार बी. यांनी सांभाळली असून विवेके ओबरॉय आणि संदीप सिंग हे या चित्रपटाचे निर्माते आहेत. ओमंग कुमारने या पूर्वी देखील बायोपिक्सच्या दिग्दर्शनाची जबाबदारी यशस्वीरीत्या पार पडली असून त्याने मेरी कॉम चित्रपटाचे देखील दिग्दर्शन केले होते. दरम्यान आज ‘पीएम नरेंद्र मोदी’ सिनेमाचं पोस्टर २३ भाषांमध्ये रिलीज करण्यात आल आहे.


-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)