पंतप्रधान मोदींना मेलद्वारे जीवे मारण्याची धमकी

नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. दिल्ली पोलिस आयुक्तांना याबाबतचा मेल आला असून हा नेमका कोणी पाठवला आहे. या संदर्भात अद्याप माहिती समोर आलेली नाही. मात्र या मेलमुळे मोदींच्या जीवाला धोका असल्याचे समोर आले आहे. धमकीच्या मेलमुळे दिल्लीतील पोलीस यंत्रणा, गुप्तचर यंत्रणा आणि सुरक्षा यंत्रणांना सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत. पोलिसांकडून या मेलची चौकशी करण्यात येत आहे. दिल्ली पोलीस कमिश्नर  यांना आलेल्या मेल मध्ये 2019 वर्षातील तारीख नमूद केली गेली आहे.

दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मेल हा आसाम ज़िल्हा मधून आलेला आहे. यापूर्वी भीमा-कोरेगाव हिंसाचार  प्रकरणात पंतप्रधान मोदी यांच्या विरोधात जीवे मारण्याचा कट रचल्याचे पत्र डाव्या विचारसरनीच्या लोकांकडून मिळाले होते. या पत्रामध्ये  ज्याप्रमाने माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची हत्या करण्यात आली त्याच  प्रमाणे मोदींची हत्या करण्याचा उल्लेख केला होता. या पत्रानंतर अनेक दिग्गज लोकांना अटक करण्यात आले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)