पंतप्रधान नरेंद्र मोदींची ‘यंदाची दिवाळी’ केदारनाथमध्ये

नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यावर्षीची दिवाळी साजरी करण्यासाठी उत्तराखंड राज्यातील केदारनाथ येथे जाणार आहेत.

सूत्रांच्या माहितीनुसार , नरेंद्र मोदी हे 7 नोव्हेंबर रोजी केदारनाथ येथे पोहचतील. तिथे ते केदारनाथाची पूजा करतील. केदारनाथमध्ये मोदी कोणतीही सभा घेणार नाहीत. मात्र, ते सरस्वती नदीच्या परिसरात सुरु असलेल्या विकासकामांची पाहणी करतील, असे सूत्रांकडून सांगण्यात आले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

मोदी हे मागील वर्षात दोनदा केदारनाथ येथे गेलेले आहेत.  केदारनाथ मंदिर हे भगवान शंकराचे मंदिर आहे. केदारनाथ हिंदू धर्मातील सर्वात पवित्र स्थानांपैकी एक असून ते बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मागील वर्षी जम्मू-काश्मीर येथे भारतीय जवानांसोबत दिवाळी साजरी केली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)