नरेंद्र मोदींनी अयोध्येत जाऊन हिंदू असल्याचे प्रमाणपत्र द्यावे- प्रवीण तोगडिया

मोदींनी राम मंदिरप्रकरणात देशातील हिंदुंचा विश्वासघात केला 

लखनौ: विश्व हिंदू परिषदेचे माजी आंतरराष्ट्रीय मंत्री प्रवीण तोगडिया यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. नरेंद्र मोदींनी अयोध्येत जाऊन हिंदू असल्याचे प्रमाणपत्र द्यावे, असे आव्हान त्यांनी दिले आहे. भाजपासाठी राम मंदिर हा निवडणुकीचा मुद्दा आहे. चहावाला पण निवडणुकीचा मुद्दा होता आता चौकीदारही तसाच प्रकार असल्याचे तोगडिया म्हणाले.

प्रवीण तोगडिया म्हणाले, मोदींनी राम मंदिरप्रकरणात देशातील हिंदुंचा विश्वासघात केला आहे. केंद्र सरकारने शेतकरी आणि युवकांचीही फसवणूक केली आहे. अडवाणी, जोशी जे कालपर्यंत मार्गदर्शक होते. त्यांना आता मूकदर्शक बनवले आहे.

मोदींच्या कार्यकाळात एक हजार सैनिक मारले गेले. यावर कोणीच चर्चा करत नाहीत. निवडणूक हाच त्यांचा राष्ट्रवाद आहे. भारताचा प्रत्येक नागरिक देशभक्त आहे. काश्मीरमध्ये लष्करावर दगडफेक करणाऱ्यांवर सक्त कारवाई केली पाहिजे, अशी मागणी देखील तोगडिया यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)