‘चांद्रयान-2’ चं प्रक्षेपण हा भारतीयासाठी ऐतिहासिक क्षण – नरेंद्र मोदी

नवी दिल्ली – अंतराळात भारताने आज नवा इतिहास निर्माण केला. देशवासीयांसह संपूर्ण जगाचे लक्ष लागून राहिलेल्या इस्रोच्या चांद्रयान-2 आज दुपारी 2.43 मिनिटांनी चंद्राच्या दिशेने झेपावले. यान यशस्वीपणे अवकाशात झेपावल्यानंतर शास्त्रज्ज्ञांसह देशवासियांनी एकच जल्लोष केला.

‘चांद्रयान-2’च्या यशस्वी भरारीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्रोच्या ‘चांद्रयान-2’ कामगिरीचं कौतुक केलं आहे. तसेच ‘चांद्रयान 2’ अवकाशात झेपावताच त्यांनी दोन्ही हातांनी टाळ्या वाजवून आनंद साजरा केला आणि इस्रोतील सर्वच शास्त्रज्ञांचे अभिनंदनही केले आहे.

नरेंद्र मोदीं यांनी शास्त्रज्ञांचे कौतूक करताना प्रत्येक भारतीयासाठी हा ऐतिहासिक आणि अभिमानाचा क्षण असल्याचे म्हटले आहे. भारताने आज इतिहास रचला आहे. 130 कोटी भारतीयांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी सगळ्याच शास्त्रज्ञांनी हातभार लावला, असंही मोदी यांनी म्हटले आहे.

 

”चांद्रयान-2 मोहीम देशातील कोट्यवधी तरुणांना प्रेरणा देणारी आहे. तरुणांचा विज्ञानकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलणारी आणि उत्कृष्ट दर्जाच्या संशोधनाची आवड निर्माण करणारी ही प्रयत्नशील मोहीम आहे. चंद्राच्या दक्षिण ध्रवावरील विवरांमध्ये अभ्यास आणि संशोधनाचे काम ‘चांद्रयान-2’ द्वारे होत आहे. त्यामुळे ही मोहीम युनिक असल्याचंही पंतप्रधान मोदींनी ट्विट करुन म्हटले आहे.

या मोहिमेतून चंद्राबद्दलची नवीन माहिती जगासमोर येईल. यापूर्वी अशी मोहीम कधीही झाली नसल्याचंही पंतप्रधानांनी सांगितलं. ‘चांद्रयान-2’ ही मोहीम देशातील प्रत्येकाला अत्यानंद देणार आहे.”

 

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)